अॅपल कंपनीची उत्पादनं उच्च प्रतीची म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच अॅपल कंपनीच्या उत्पादनांमध्ये असलेल्या बॅटरीची क्षमताही उत्तम असते. आयफोन, आयपॅड, मॅक, अॅपल वॉच या गॅजेट्सच्या बॅटरीजचं लाइफ चांगलंच असतं. परंतु, गेल्या काही काळात अॅपलच्या उत्पादनांबाबत असा आक्षेप घेण्यात आला की, आयफोनच्या काही मॉडेल्सची बॅटरी खूप लवकर डिस्चार्ज होते. या आक्षेपांनंतर कंपनीतर्फे ग्राहकांना बॅटरी आणि परफॉर्मन्स मॅनेजमेंटसारखी उपयुक्त फीचर्स आपल्या मॉडेल्समध्ये देण्यास सुरुवात केली आहे. या फीचर्सच्या साह्याने ग्राहकांना आपल्या डिव्हाइसचं बॅटरी लाइफ चांगलं ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे.
अॅपल कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना डिव्हाइस कसं वापरावं यासाठी मार्गदर्शक सल्लेही देते. फोनसाठी उपयुक्त अशी सॉफ्टवेअर अपडेट करणं, हाय अॅम्बियंट टेंपरेचरपासूनही डिव्हाइसचं संरक्षण आदी बाबींचा त्यात समावेश आहे. काही मॉडेल्स चार्जिंग करताना डिव्हाइस केसपासून वेगळं करावं लागतं. अॅपलने बॅटरी लाइफ चांगलं राहावं यासाठी वेबसाइटवर काही छोट्या टिप्सही दिल्यात. त्यांची माहिती घेऊ या.
ब्राइटनेस अॅडजस्ट करावा
आयफोनच्या स्क्रीनचा ब्राइटनेस अॅडजस्ट केल्यास फोनची बॅटरी अधिक सक्षमरीत्या काम करू शकते. गरज पडल्यासच वाय-फायचा वापर करावा. यामुळे बॅटरी दीर्घ काळ चालते आणि लवकर ड्रेन होत नाही. आयफोनच्या स्क्रीनचा ब्राइटनेस डिम करणं किंवा ऑटो-ब्राइटनेसचा पर्याय वापरणं हितावह ठरतं. बॅटरीची कार्यक्षमताही चांगली राहते.
अपडेट करणं आहे आवश्यक
आयफोनची बॅटरीची क्षमता फोन अपडेट करूनही वाढवता येते. आयफोन अपडेट ठेवण्यासाठी डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जा. ‘जनरल’ हा पर्याय निवडा. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डिव्हाइससाठी असलेल्या अपडेट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानुसार तुमचा आयफोनच्या अपडेशनची प्रक्रिया सुरू होईल. परंतु, फोन अपडेट करण्यापूर्वी तुमची बॅटरी फुल असल्याची खात्री करून घ्या.
हेही वाचा - WhatsApp Ban: व्हॉट्सअॅपकडून 26 लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी; तुम्ही ही चूक करत नाही ना?
डिस्प्लेचा ब्राइटनेस कमी करा
डिस्प्लेचा ब्राइटनेस कमी करून तुम्ही तुमच्या फोनचं बॅटरी लाइफ वाढवू शकता. यासाठी तुम्हाला फोनमधलं कंट्रोल सेंटर ओपन करावं लागेल. त्यानंतर ब्राइटनेस स्लायडर कमी करा. मग ऑटो ब्राइटनेसचा पर्याय निवडण्यासाठी डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘जनरल’ ऑप्शन निवडा. त्यानंतर अॅक्सेसिबिलिटी पर्यायावर क्लिक करा. आता डिस्प्ले अकॉमोडेशनवर क्लिक करा. मग ऑटो ब्राइटनेसचा पर्याय निवडा.
लो- पॉवर मोड इनेबल करा
आयफोन युझर्स फोनची बॅटरी कमी झाल्यास लो-पॉवर मोडही ऑन करू शकतात. फोनची बॅटरी 20% किंवा त्यापेक्षा कमी असते तेव्हा तुम्हाला फोनवर एक नोटिफिकेशन येतं. त्याच नोटिफिकेशनवर क्लिक करून लो-पॉवर मोडचा पर्याय निवडा.तसंच तुम्ही ही प्रक्रिया मॅन्युअलीही करू शकता. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन स्क्रोल डाउन केल्यावर बॅटरी हा पर्याय निवडा. आत लो-पॉवर मोडवर जाऊन ऑन करा. बॅटरी नक्कीच जास्त वेळ चालेल आणि फोनही सुरू राहील.
हेही वाचा - आधी Facebook नंतर WhatsApp अन् आता Instagram डाउन; झुकरबर्गच्या मेटाला झालंय काय?
अॅप बॅकग्राउंडला रिफ्रेश होण्याची प्रक्रिया थांबवा
अॅपल युझर्स अॅप्स बॅकग्राउंडला रिफ्रेश होण्याची प्रक्रिया थांबवू शकतात. यामुळे बॅटरी लाइफही वाढू शकेल. अॅप रिफ्रेश होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जा आणि ‘जनरल’वर क्लिक करा. त्यानंतर बॅकग्राउंड अॅप रिफ्रेशचा पर्याय निवडा आणि ऑन/ऑफ पर्यायातला ऑफ ऑप्शन सिलेक्ट करा.
लोकेशन ऑफ करा
लोकेशन सर्व्हिसचा ऑप्शन ऑफ केल्यासही बॅटरी जास्त वेळ चालते. यासाठी डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शन निवडा. मग लोकेशन सर्व्हिस पर्यायावर क्लिक करा. यामुळे तुम्हाला फोनमधली कुठली अॅप्स लोकेशन सर्व्हिसचा उपयोग करताहेत याची माहिती मिळेल. या ठिकाणी तुम्हाला लोकेशन सर्व्हिस टर्न ऑफ करण्याचा पर्याय मिळेल. हा पर्यायावर जाऊन ऑफ हा पर्याय सिलेक्ट करा. त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी सक्षम राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone, Technology