मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Voter ID Card मध्ये घरबसल्या असा अपडेट करा Address, पाहा सोपी प्रोसेस

Voter ID Card मध्ये घरबसल्या असा अपडेट करा Address, पाहा सोपी प्रोसेस

तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला असाल तर वोटर कार्डवरील पत्ता बदलणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया सोपी असून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीद्वारेही वोटर कार्डवरील पत्ता बदलता येतो.

तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला असाल तर वोटर कार्डवरील पत्ता बदलणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया सोपी असून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीद्वारेही वोटर कार्डवरील पत्ता बदलता येतो.

तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला असाल तर वोटर कार्डवरील पत्ता बदलणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया सोपी असून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीद्वारेही वोटर कार्डवरील पत्ता बदलता येतो.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर : मतदार ओळखपत्र भारतीय नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने दिलेलं ओळखपत्र आहे. हे भारतीय नागरिकासाठी आयडेंटिटी प्रूफ किंवा अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणूनही वापरलं जातं. निवणुकीवेळी मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र अर्थात Voter ID असणं गरजेचं आहे.

Voter ID केवळ वोटिंगसाठीच नसून हे कार्ड सरकारी योजनांसाठीही महत्त्वाचं आहे. भारतीय निवडणूक आयोगानुसार मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाकडे वोटर कार्ड असू शकतं.

तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला असाल तर वोटर कार्डवरील पत्ता बदलणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया सोपी असून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीद्वारेही वोटर कार्डवरील पत्ता बदलता येतो. जर तुम्हाला तुमचा पत्ता ऑफलाइन पद्धतीने बदलायचा असेल, तर तुमच्या सध्याच्या पत्त्याच्या पुराव्यासह एक अर्ज तुमच्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल.

Aadhaar Card हरवलंय? Online असा शोधा आधार नंबर

वोटर कार्डवरील पत्ता ऑनलाइन पद्धतीने बदलायचा असल्याच काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

- सर्वात आधी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल www.nvsp.in वर लॉगइन करा.

- तुम्ही दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या मतदार संघात गेला असाल, तर Online Application for registration of new voter/Transfer from AC to AC अंतर्गत फॉर्म 6 वर क्लिक करावं लागेल.

- जर तुम्ही एकाच मतदारसंघात परंतु दुसऱ्या ठिकाणी गेला असाल, तर फॉर्म 8A वर क्लिक करा.

- इथे तुमचं नाव, जन्म तारीख, राज्य, मतदारसंघ, सध्याचा पत्ता अशी आवश्यक माहिती भरावी लागेल.

- काही डिटेल्स ऑप्शनल आहेत, ज्यात ईमेल आयडी, मोबाइल नंबर आहे.

- आता फोटो, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि वयाच्या पुराव्यासह सर्व कागदपत्र अपलोड करा.

- सर्व अपलोड केलेल्या कागदपत्रांसह फॉर्म ऑनलाइन जमा करा.

- आता डिक्लेरेशन आणि कॅप्चा कोड भरा.

- सर्व डिटेल्स वेरिफाय करा आणि सबमिटवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Tech news