मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Mobile Tips: मोबाईल पॅटर्न किंवा पासवर्ड विसरलाय? काही मिनिटांत अनलॉक करू शकता, फॉलो करा प्रोसेस

Mobile Tips: मोबाईल पॅटर्न किंवा पासवर्ड विसरलाय? काही मिनिटांत अनलॉक करू शकता, फॉलो करा प्रोसेस

Mobile Tips: मोबाईल पॅटर्न किंवा पासवर्ड विसरलाय? काही मिनिटांत अनलॉक करू शकता, फॉलो करा प्रोसेस

Mobile Tips: मोबाईल पॅटर्न किंवा पासवर्ड विसरलाय? काही मिनिटांत अनलॉक करू शकता, फॉलो करा प्रोसेस

Mobile Pattern Unlock Tips: आपल्या मोबाईलमध्ये आपली माहिती असते. ती सुरक्षित करणं आवश्यक असतं, यासाठी आपण आपल्या मोबाईलला पॅटर्न किंवा पासवर्ड टाकून लॉक करून ठेवतो. पण जर तुम्ही पॅटर्न किंवा पासवर्ड विसरलात तर तुम्ही तो अनलॉक कसा करू शकता?

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 20 जुलै: मोबाइल आता काळाची गरज झालीये, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. आपल्या आजूबाजूला जेवढे लोक आपण पाहतो, त्यांच्यापैकी जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे तुम्हाला मोबाइल फोन दिसेल. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते घरात बसलेल्या वृद्धांपर्यंत मोबाईल फोन ही गरज बनली आहे. तुम्हाला घरी बसून खरेदी करायची असेल, घरी बसून वीज बिल भरायचं असेल, बँकेशी संबंधित काम करायचं असेल, जेवणाची ऑर्डर द्यायची असेल, अशी अनेक कामं मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही सहज करू शकता. परंतु मोबाईलमध्ये युजरची माहिती अधिक असल्याने ती सुरक्षित करणं देखील आवश्यक आहे, यासाठी आपण आपल्या मोबाईलला पॅटर्न किंवा पासवर्ड टाकून लॉक करून ठेवतो. पण जरा कल्पना करा की जर तुम्ही पॅटर्न किंवा पासवर्ड विसरलात तर तुम्ही तो अनलॉक (Mobile Pattern Unlock Tips) कसा करू शकता? कदाचित तुम्हाला याबद्दल माहिती नसेल? चला तर मग जाणून घेऊया, अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा मोबाईल फोन कसा अनलॉक करू शकता. तुम्ही पॅटर्न किंवा पासवर्ड विसरल्यास, तुम्ही मोबाईल फोन याप्रमाणे अनलॉक करू शकता:- स्टेप 1- जर तुमच्यासोबत असं घडलं की तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा पॅटर्न किंवा पासवर्ड विसरलात आणि आता तुम्ही तुमच्या मोबाईलचे लॉक उघडू शकत नाही. त्यामुळे अशा स्थितीत तुम्हाला प्रथम तुमचा मोबाईल फोन बंद करावा लागेल आणि नंतर सुमारे एक मिनिट थांबावं लागेल. हेही वाचा: Whatsapp Payment: फक्त फोन पे, गुगल पे नाही, व्हॉट्सअपवरूनही पाठवता येतात पैसे, असं अ‍ॅड करा बँक अकाउंट स्टेप 2- त्यानंतर मोबाईल फोनचे पॉवर बटण आणि व्हॉल्यूम डाउन बटण एकत्र दाबा. तुमचा मोबाइल रिकव्हरी मोडमध्ये येईपर्यंत हे करा. स्टेप 3- आता तुमचा मोबाईल फोन रिकव्हरी मोडमध्ये आहे, येथे तुम्हाला 'फॅक्टरी रीसेट' पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला 'Wipe Cache' चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा जेणेकरून तुमचा सर्व डेटा क्लियर होईल. स्टेप 4 - आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाइल फोन पुन्हा चालू करावा लागेल. आता तुमचा मोबाईल पुन्हा चालू होईल. परंतु लक्षात ठेवा असं केल्यानं स्मार्टफोनमधील सर्व डेटा हटविला जातो. त्यामुळं केवळ अडचणीच्या वेळीच ही ट्रिक वापरा, अन्यथा तुम्ही स्मार्टफोन कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला जाऊन अनलॉक करायचा प्रयत्न करा. असं केल्यानं कदाचित तुमच्या मोबाईलमधील माहिती वाचू  शकते.
First published:

Tags: Smartphone

पुढील बातम्या