नवी दिल्ली, 17 मे : जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला असेल, तर जुन्या फोनमधील कॉन्टॅक्ट्स नव्या फोनमध्ये ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. जुना फोनमधला असा अनेक डेटा नव्या फोनमध्ये घ्यायचा असतो, पण याबाबत माहिती नसल्याने समस्या वाटू शकते. पण जुन्या फोनमधून कॉन्टॅक्ट्ससह इतर डेटा नव्या फोनमध्ये सहजपणे घेता येऊ शकतो.
- गुगल प्रत्येक अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये Google Cloud हे फीचर देतं. हे फीचर मोबाईल फोनचा डेटा वेळोवेळी सिंक करते. जर तुम्ही Google Cloud साठी साइन-अप केलं असेल, तर तुमचे कॉन्टॅक्ट्स नव्या फोनमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्या अकाउंटमधून लॉगइन करावं लागेल.
- तुमचं अकाउंट गुगल अकाउंटशी सिंक आहे, की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या फोन Settings मध्ये जा. त्यानंतर Accounts मध्ये Google वर टॅप करुन, कॉन्टॅक्ट्स बटण एनेबल केलं आहे, की नाही ते तपासा.
- जर कॉन्टॅक्ट्स बटण एनेबल नसेल, तर ते टॉगल बटणने ऑन करा. त्यानंतर तुमचे सर्व कॉन्टॅक्ट्स गुगल अकाउंटशी सिंक होतील.
- आता नव्या फोनमध्ये त्याच ईमेलवरुन लॉगइन करावा लागेल आणि सर्व कॉन्टॅक्ट्स आपोआप तुमच्या फोनशी लिंक होतील. जर तुम्ही दुसऱ्या ईमेलवरुन आधीच लॉगइन केलं असेल, तर Add new वर टॅप करुन नव्या गुगल अकाउंटशी जोडू शकता.
- जर तुमचे कॉन्टॅक्ट्स गुगलसह शेअर करायचे नसतील, तर कॉन्टॅक्ट्स सिममध्ये सेव्ह करावे लागतील.
- कॉन्टॅक्ट्स सिममध्ये सेव्ह करण्यासाठी Contact अॅपच्या टॉपला असलेल्या उजव्या बाजूच्या Setting मध्ये जा, त्यानंतर Import / Export ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर Export करुन सर्व कॉन्टॅक्ट्स सिममध्ये एक्सपोर्ट होतील.
- तसंच, सिममधून कॉन्टॅक्ट्स नव्या फोनमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी Contact>settings मध्ये Import / Export पर्यायातून, इम्पोर्टवर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.