मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

लॅडलाईन नंबरवर सुरू करू शकता Whats App; 'या' टिप्स फॉलो करा!

लॅडलाईन नंबरवर सुरू करू शकता Whats App; 'या' टिप्स फॉलो करा!

तास-न्-तास स्मार्ट फोनवर वेळ घालवणाऱ्यांना बऱ्याच जणांकडून वारंवार दम भरला जातो. पण सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. व्हॉट्सअॅपसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक वेळ घालवणं आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने हिताचं असतं, असं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियाचा जास्त वापर करणाऱ्या लोकांचं मानसिक आरोग्य उत्तम असतं, अशी माहिती समोर आली आहे.

लॅडलाईन नंबरवर देखील Whats App वापरता येऊ शकते.

  • Published by:  Akshay Shitole

नवी दिल्ली, 29 जुलै: मेसेजिंग अॅपमधील सर्वात लोकप्रिय असलेले Whats App हे आता केवळ मेसेजिंग अॅप राहिले नाही. तर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची देखील सोय आहे. Whats Appमधील अनेक बदल आणि त्याच्या टिप्स तुम्ही वाचल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला Whats Appमधील अशी टिप्स सांगणार आहोत जी तुम्ही कुठेच वाचली नसतील.

Whats Appचा वापर करायचा असेल त्यासाठी आवश्यक असे डिव्हाईस, इंटरनेट आणि मोबाईल नंबर लागतो. पण हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की लॅडलाईन नंबरवर देखील Whats App वापरता येऊ शकते. तुम्हाला मोबाईल नंबर शिवाय दुसऱ्या एखाद्या नंबरवर Whats App वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्ही लॅडलाईन नंबरचा वापर करू शकता. काही महिन्यांपूर्वी Whats Appने बिझनेस अॅप लॉन्च केले होते. बिझनेस अॅपमुळे Whats App आणखी सुरक्षित झाले आहे. इतक नव्हे तर छोट्या व्यवसायिकांना Whats Appचा वापर लॅडलाईन क्रमांकावर करता येऊ शकतो.

कसे सुरू कराल लॅडलाईनवर Whats App

1) सर्वात आधी तुमच्या मोबाईल फोनवर WhatsApp Business डाऊनलोडन करून घ्या.

2) त्यानंतर अॅप ओपन करुन देशाची निवड करा. देशाची निवड केल्यानंतर तुमच्याकडून 10 अंकी मोबाईल नंबर विचारला जाईल. या ठिकाणी तुम्ही लॅडलाईन नंबर देखील देऊ शकता.

3)ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाल SMS अथवा कॉल केला जाईल. तुम्ही लॅडलाईन नंबर दिल्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी SMS येणार नाही. पण Whats App प्रथम व्हेरिफिकेशनसाठी SMS पाठवते. एक मिनिटानंतर पुन्हा एकदा SMS किव्हा कॉलचा पर्याय अॅक्टिव्ह होतो. तेव्हा तुम्ही Call Meचा पर्याय निवडा.

4) तुम्ही Call Meचा पर्याय निवडतात लॅडलाईन नंबरवर फोन येईल. या फोनमध्ये 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड सांगितला जाईल.

5) संबंधित कोड तुम्ही अॅपमध्ये टाकताच लॅडलाईन नंबरचा वापर WhatsAppसाठी करू शकता.

6) विशेष म्हणजे या नंबरसाठी तुम्ही WhatsAppवर प्रोफाईल फोटो आणि नाव असे फिचर्स वापरू शकता.

SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला कुणी लावला सुरूंग? पवारांची काय असेल रणनीती?

First published:

Tags: Whats app news