मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता विना इंटरनेट Android युजर्सला शेअर करता येणार Apps, जाणून घ्या प्रोसेस

आता विना इंटरनेट Android युजर्सला शेअर करता येणार Apps, जाणून घ्या प्रोसेस

Nearby Share हे फीचर सर्वात आधी ऑगस्ट 2020 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. अँड्रॉईड युजर्सला फाईल्स, फोटो, व्हिडीओ शेअर करण्याची आणि मिळवण्याची परवानगी दिली होती. आता Nearby Share द्वारे फाईल्स, फोटो, व्हिडीओसह अ‍ॅप्सदेखील शेअर करता येणार आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 जुलै : गुगलने (Google) आपल्या अँड्रॉईड युजर्ससाठी (Android Users) खास सुविधा आणली आहे. गुगलचं नियरबाय (Nearby) अँड्रॉईड युजर्सला आपल्या फाईल्स डिव्हाईसमध्ये शेअर करण्याची सुविधा देतं. आता गुगल नियरबाय शेअरचा (Nearby Share) उपयोग करुन युजर्सला जवळपासच्या अँड्रॉईड डिव्हाईससह अ‍ॅप्स शेअर करण्याची सुविधाही देतं. Nearby Share सर्वात आधी ऑगस्ट 2020 मध्ये लाँच करण्यात आलं होतं आणि केवळ अँड्रॉईड युजर्सला फाईल्स, फोटो, व्हिडीओ शेअर करण्याची आणि मिळवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये Nearby Share द्वारे फाईल्स, फोटो, व्हिडीओसह आता अ‍ॅप्स शेअर (Apps Share) करण्याच्या क्षमतेची घोषणा करण्यात आली आणि यावर्षी फेब्रुवारीपर्यंत हे युजर्ससाठी रोलआउट करण्यात आलं.

इंटरनेट कनेक्शन किंवा वाय-फायचीही गरज नाही -

नवी सुविधा युजर्सला गुगल प्लेवरुन (Google Play Store) आपल्या आसपासच्या लोकांसोबत अँड्रॉईड स्मार्टफोनसह अ‍ॅप शेअर करण्याची परवानगी देतं. यासाठी कोणत्याही वाय-फाय (Wi-Fi) किंवा इंटरनेट कनेक्शनची (Internet Connection) गरज लागत नाही. नव्या सुविधेचा वापर करण्यासाठी युजर्सला आपल्या अँड्रॉईड फोनवर गुगल प्ले स्टोरवर जावं लागेल. इथे प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. आणि अ‍ॅप्स किंवा डिव्हाईस प्रतिबंधित करा, या पर्यायाची निवड करावी लागेल. इथे युजर्सला दोन बटणांसह शेअर अ‍ॅप्स पर्याय दिसेल आणि रिसिव्ह किंवा शेअर करायच्या अ‍ॅप्सची यादी दिसेल.

चुकूनही शेअर करू नका तुमचे पर्सनल डिटेल्स,अन्यथा....जिओ युजर्सला सतर्कतेचा इशारा

युजरला एखादं अ‍ॅप पाठवायचं असेल, तर Send वर क्लिक करावं लागेल आणि अ‍ॅप मिळवण्यासाठी Receive वर क्लिक करावं लागेल. अ‍ॅप्स पाठवताना युजर्स एकाहून अधिक अ‍ॅप्सही पाठवू शकतात. हे फीचर अँड्रॉईड 11 बेस्ड (Android 11) असणाऱ्या वनप्लस 7 प्रो वर (Oneplus 7 pro) वापरण्यात आलं असून ते पूर्णपणे काम करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Android, Google, Tech news