नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : सध्याच्या काळात अनेक जण शॉपिंगपासून बँकिंगपर्यंत बहुतेक कामांसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करतात. अशात स्मार्टफोन, लॅपटॉप, कंप्यूटर, स्मार्ट गॅजेट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गॅजेट्सची किंमत अधिक असते. त्यामुळे अशा महागड्या वस्तू खराब झाल्यास, तुटल्यास, हरवल्यास मोठं नुकसान होतं. त्यामुळे स्मार्ट गॅजेट्सचा इन्शोरन्स (Gadget Insurance) करणं महत्त्वाचं ठरतं.
गॅजेट्स हरवल्यास त्यातील डेटाही चोरी होण्याचा धोका असतो आणि युजरला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो. यामुळे कंपन्या इन्शोरन्स प्लॅन देतात. हे इन्शोरन्स गॅजेट्सच्या चोरीनंतर किंवा अचानक तुटल्यानंतर कव्हरेज देतात. सूचना दिल्यानंतर 48 तासांमध्ये हरवलेला किंवा खराब झालेल्या फोनला बदलता येतं. रिपेअरिंगसाठी गॅजेट्सच्या डोर स्टेप पिक आणि ड्रॉपची सुविधाही मिळते. टेक्निकल समस्या ईअर जॅक, चार्जिंग पोर्ट आणि टच स्क्रिनसारख्या समस्यांमध्ये कंपन्या इन्शोरन्स कव्हर देतात.
गॅजेट्स इन्शोरन्स क्लेम कसा कराल?
- आधी इन्शोरन्स कंपनीच्या टोल फ्री नंबरवर गॅजेट्सच्या नुकसानाबाबत सांगा.
- ग्राहकांना क्लेम फॉर्म भरावा लागेल. फॉर्म ऑनलाईन किंवा इन्शोरन्स कंपनी ऑफिसमध्ये जमा करा.
- चोरी झाल्यास, पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करा, याची एक कॉपी इन्शोरन्स कंपनीकडे द्यावी लागेल.
- घरात आग लागल्यास, त्यात गॅजेट्सचं नुकसान झालं असेल, तर काही कंपन्यांकडून फायर स्टेशनचा रिपोर्ट मागितला जाईल.
- तसंच क्लेम सर्वेयरला डॅमेज गॅजेट्सचा फोटोही द्यावा लागतो.
- काही कंपन्या केवळ एकदाच क्लेम देतात, तर काही पॉलिसीमध्ये एकाहून अधिक क्लेम मिळतो.
- गॅजेट्स इन्शोरन्स पॉलिसी घेताना नियम आणि अटी योग्यरित्या वाचणं गरजेचं आहे.
या परिस्थितीत इन्शोरन्स क्लेम होत नाही -
- गॅजेट्सचं असं काही नुकसान झालं, ज्याबाबत इन्शोरन्स घेणाऱ्या व्यक्तीला योग्यरित्या न सांगता आल्यास त्याला इन्शोरन्स मिळत नाही.
- गॅजेट्सला जाणून-बूजून नुकसान केल्यास.
- पावसात गॅजेट्स भिजल्यामुळे खराब झाल्यास.
- गॅजेट्सची इन्शोरन्स पॉलिसी घेण्याआधी ते खराब होणं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.