व्हॉट्सअॅप (Whatsapp) हॅक केल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप सेक्यूरिटीबाबत (Whatsapp Security) युझरमध्ये भीती असते. मात्र तुम्ही सेटिंग्जमध्ये काही बदल केल्यास तुमचे अकाउंट कधीच हॅक होणार नाही.
यासाठी सर्व प्रथम, आपल्या फोनचे व्हॉट्सअॅप उघडा. यानंतर, सेटिंग्ज वर क्लिक करा, त्यानंतर अकाउंटवर क्लिक करा. आता आपल्याला टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा (Two-step Verification) पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून ते अनेबल (Enable) करा.
यावरून तुम्ही एक 6-अंकी पिन (PIN) तयार करू शकता. याचा फायदा असा कोणत्याही नवीन फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालू करण्यासाठी या नवीन पिनची गरज असले.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन कोडद्वारे पिन तयार केल्यानंतर तुम्हाल ईमेल अॅड्रेस लिंक करण्याचा पर्याय येईल.
तुम्ही तुमचा पिन विसरल्यास, व्हॉट्सअॅप तुम्हाला मेल करून नवी व्हेरिफिकेशन लिंक पाठवेल.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.