नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : जीमेल (Gmail) लवकरच आपल्या युजर्ससाठी जबरदस्त फीचर आणणार आहे. या फीचरमुळे अकाउंट हॅक (Hacking) होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. जीमेलचं हे फीचर लवकरच सुरू होणार आहे. या फीचरमुळे जीमेल आधीच्या तुलनेत अधिक सिक्योर (Gmail Security) होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नव्या फीचरनुसार, Gmail मध्ये ब्राँड लोगो एक सुरक्षा सर्विस देण्यात येणार आहे. Google ने दिलेल्या माहितीनुसार, या फीचरमध्ये ब्राँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन (BIMI) नावाच्या एक पॅरामीटरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे Email अधिक सुरक्षित करण्यासाठी मदत होणार आहे.
BIMI फीचरमुळे स्पॅम आणि फिशिंग असे प्रकार संपुष्ठात येऊ शकतात. कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये सांगितलं, की एकदा या Email ने आमचे सर्व मापदंड पार केल्यानंतर Gmail मध्ये यूआयएम स्लॉटमध्ये Logo दिसू लागेल. या लोगोद्वारेच सुरक्षा सर्विस देण्यात येणार आहे.
दरम्यान, जगभरात पर्सनल ईमेलसाठी Gmail चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जीमेल अकाउंट सिक्योर ठेवण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two Step Verification) चाही वापर करता येतो. Two Step Verification चं वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्याला तुमचा पासवर्ड समजला, तरी तो पासवर्डद्वारे ईमेल ओपन करू शकत नाही. कारण अकाउंट ओपन करण्यासाठी पासवर्डसह व्हेरिफिकेशन कोडचीही गरज असते, जो तुमच्या मोबाईलवर येतो. जोपर्यंत व्हेरिफिकेशन कोड टाकला जात नाही, तोपर्यंत अकाउंट ओपन होणार नाही. त्यामुळे जीमेलच्या सुरक्षेसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करणं फायद्याचं ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.