मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp वरही Schedule करू शकता मेसेज, जाणून घ्या सोपी ट्रिक

WhatsApp वरही Schedule करू शकता मेसेज, जाणून घ्या सोपी ट्रिक

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अद्यापही मेसेज शेड्युल (Schedule) करण्यासाठी कोणतंही फीचर नाही. कंपनीकडून हे फीचर नसलं, तरी एका ट्रिकने मेसेज शेड्युल करता येऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अद्यापही मेसेज शेड्युल (Schedule) करण्यासाठी कोणतंही फीचर नाही. कंपनीकडून हे फीचर नसलं, तरी एका ट्रिकने मेसेज शेड्युल करता येऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अद्यापही मेसेज शेड्युल (Schedule) करण्यासाठी कोणतंही फीचर नाही. कंपनीकडून हे फीचर नसलं, तरी एका ट्रिकने मेसेज शेड्युल करता येऊ शकतात.

नवी दिल्ली, 23 मे : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) वापर आता पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही प्रकारच्या कामासाठी होतो आहे. कंपनी युजर्सच्या सुविधेसाठी सतत नवे फीचर्स लाँच करत आहे. परंतु व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अद्यापही मेसेज शेड्युल (Schedule) करण्यासाठी कोणतंही फीचर नाही. कंपनीकडून हे फीचर नसलं, तरी एका ट्रिकने मेसेज शेड्युल करता येऊ शकतात. एखाद्याला रात्री 12 वाजता वाढदिवच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा एखाद्या मिटिंगसंबंधी मेसेज करायचा असल्यास, ही मेसेज शेड्युलची ट्रिक वापरता येऊ शकते.

Android स्मार्टफोनसाठी -

- यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर SKEDit अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल.

- त्यानंतर अ‍ॅप ओपन करुन Sign Up करा.

- लॉगइन करुन Main Menu मध्ये WhatsApp वर टॅप करावं लागेल.

- आता युजरकडे काही परमिशन्स मागितल्या जातील.

- त्यानंतर Enable Accessibility वर क्लिक करावं लागेल आणि Use service वर टॅप करावं लागेल.

- आता व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याला मेसेज शेड्युल करायचा आहे, त्याला Add करा. त्यानंतर मेसेज लिहा आणि schedule date and time करा. यात रिपीटचाही ऑप्शन आहे, ज्याच्या मदतीने अनेकदा मेसेज पाठवू शकता.

(वाचा - कोण पाहतंय तुमचा WhatsApp Profile Photo? ही आहे सोपी ट्रिक)

- त्याशिवाय Ask Me Before Sending चा पर्यायही दिसेल. यासाठी ‘ON’आणि ‘OFF’ चा पर्याय मिळेल.

- हा पर्याय ON करुन मेसेज शेड्युल केल्यास, मेसेज पाठवण्याआधी एक नोटिफिकेशन येईल, ज्यावर क्लिक केल्यानंतर मेसेज जाईल. हा ऑप्शन OFF ठेवल्यास नोटिफिकेशन न पाठवताच मेसेज पाठवला जाईल.

(वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च केलं का? Google ने आता उचललं मोठं पाऊल)

सध्या मेसेज शेड्युल करण्याचं हे फीचर कंपनीचं अधिकृत फीचर नाही. या थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे हे फीचर वापरता येऊ शकतं. युजर्स आपल्या रिस्कवरच हे अ‍ॅप डाउनलोड करू शकतात आणि ही ट्रिक वापरु शकतात.

First published:

Tags: Tech news, Whatsapp chat, WhatsApp features