नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : व्हॉट्सअॅप (WhatsApp) जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या अॅपमध्ये सर्वच सुविधा एकाच वेळी मिळत असल्याने व्हॉट्सअॅपला जगभरात मोठी पसंती आहे. चॅटिंग, फोटो, व्हिडीओ, व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल अशा अनेक सुविधा मिळतात.
व्हॉट्सअॅपच्या अशा काही ट्रिक्स आहेत, ज्याद्वारे चॅटिंग एक्सपिरिअन्स अधिकच सुविधाजनकही होतो. व्हॉट्सअॅपच्या Starred Message चाही मोठा फायदा होतो. प्रत्येकाच्या चॅट लिस्टमध्ये असे काही ग्रुप, कॉन्टॅक्ट चॅट असतात, ज्यात महत्त्वाचे मेसेज शेअर केले जातात. परंतु अनेक दिवसांनंतर चॅटमध्ये काही महत्त्वाचा मेसेज असल्यास, तो शोधण्यासाठी बराच वेळ स्क्रोल करावं लागतं. त्यामुळे स्क्रोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा व्हॉट्सअॅपच्या स्टार्ड मेसेज फीचरने ही समस्या दूर करता येते.
WhatsApp वर असे करा Starred Message -
- सर्वात आधी ज्या चॅटमध्ये महत्त्वाचा मेसेज आहे, जो तुम्हाला सेव्ह करायचा आहे तो ओपन करा.
- आता जो मेसेज महत्त्वाचा आहे, त्यावर लाँग प्रेस करा. एकाच वेळी एकाहून अधिक मेसेजही सिलेक्ट करता येऊ शकतात.
- मेसेज सिलेक्ट केल्यानंतर चॅट विंडोमध्ये वरच्या बाजूला स्टार आयकॉन दिसेल. या स्टार आयकॉनवर टॅप करुन तुमचा महत्त्वाचा, सिलेक्ट केलेला मेसेज बुकमार्क होईल, म्हणजेच तो मेसेज सेव्ह होईल.
स्टार मेसेज (Starred Message) कसा पाहाल?
- सर्वात आधी WhatsApp ओपन करा.
- त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
- इथे Starred Message हा पर्याय दिसेल.
- यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आधी सेव्ह केलेले, स्टार केलेले सर्व मेसेज दिसतील.
स्टार केलेले मेसेज अनस्टार करायचे असल्यास, पुन्हा त्या मेसेजवर सिलेक्ट करुन अनस्टार करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp chat, WhatsApp user