नवी दिल्ली, 27 जून : दर महिन्याला विजेचं बिल इतकं का येतं? या प्रश्नाचं उत्तर विज बिल पाठवणाऱ्यांकडेही नसेल. त्यामुळे विज बिल कमी कसं येईल याकडे नेहमी लक्ष ठेवणं फायद्याचं ठरेल. काही टिप्सने विज बिल कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.
इलेक्ट्रिक सामान खरेदी करताना रेटिंगकडे लक्ष द्या -
इलेक्ट्रॉनिक सामान फ्रीज, एसी अशा वस्तू खरेदी करताना रेटिंगकडे विशेष लक्ष द्यावं. नेहमी 5 स्टार रेटिंगवाली उपकरणं खरेदी करण्याचा प्रयत्न करा. अशा उत्पादनांच्या किंमती काहीशा अधिक असू शकतात. परंतु यात विज बिल अतिशय कमी येतं. तसंच अधिक कालावधीसाठी वापर केल्याचा त्याची किंमतही वसूल होते.
जुन्या बल्बच्या जागी LED -
जुने फिलामेंटवाले बल्ब आणि सीएफएल मोठ्या प्रमाणात विज कन्जूम करतात. याजागी LED बल्ब लावल्यास, केवळ विज बिल कमी येणार नाही, तर उजेडही चांगला मिळेल. आकड्यांनुसार, 100 वॅटचा फिलामेंटवाला बल्ब 10 तासात एक यूनिट विजेचा वापर करतो. तर 15 वॅटचा CFL 66.5 तासांत एक यूनिट विज घेतो. तर 9 वॅटचा LED 111 तासांनंतर एक यूनिट विज कन्जूम करतो.
काम पूर्ण झाल्यावर उपकरण बंद करावं -
काही लोक लाईट, पंखा, AC बंद केल्याशिवाय खोलीतून बाहेर येतात. विजेवर चालणारी उपकरणं वापर नसल्यास बंद करावीत. यामुळे विजेची बचत करता येईल आणि विज बिलही कमी येईल. अनेकदा काही लोक टीव्ही केवळ रिमोटने बंद करतात आणि मेन स्विच सुरूच राहतो. असं न करता टीव्ही पूर्णपणे बंद करावा.
AC 24 डिग्री टेम्परेचर -
AC नेहमी 24 डिग्री टेम्परेचरवर चालवाला. हे एक आयडियल टेम्परेचर असतं. अनेक लोक विज बिल कमी येण्यासाठी या ट्रिकचा वापर करतात. यामुळे खोलीतील थंडावाही कायम राहतो आणि विज बिलही कमी येण्यास मदत होते. टायमर लावल्यानंतर एसी आपोआप बंद होतो. असं केल्याने महिन्याला 4 ते 6 हजार रुपये वाचवता येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.