स्मार्टफोनचं चार्जिंग सारखं संपतंय? बॅटरी टिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

जास्त क्षमतेची बॅटरीसुद्धा लवकर संपत असेल तर मोबाइलमध्ये सेटिंग करून चार्जिंग जास्त वेळ टिकवता येतं.

  • Share this:

सतत स्मार्टफोन वापरणाऱ्यांना बॅटरी संपण्याची समस्या येत असते. त्यावर पर्याय म्हणून पॉवर बँकचा वापर केला जातो. तरीही नेहमीच पॉवर बँक सोबत बाळगणं कठीण असतं. मोबाईल कंपन्यासुद्धा चांगल्या बॅटरी बॅकअपचे मोबाईल बाजारात आणत आहेत. तरीही मोबाईलमध्ये काही सेटिंग करून बॅटरी वाचवता येते.

सतत स्मार्टफोन वापरणाऱ्यांना बॅटरी संपण्याची समस्या येत असते. त्यावर पर्याय म्हणून पॉवर बँकचा वापर केला जातो. तरीही नेहमीच पॉवर बँक सोबत बाळगणं कठीण असतं. मोबाईल कंपन्यासुद्धा चांगल्या बॅटरी बॅकअपचे मोबाईल बाजारात आणत आहेत. तरीही मोबाईलमध्ये काही सेटिंग करून बॅटरी वाचवता येते..

स्क्रीन टाइम आउट कमी केल्यास बॅटरी जास्त खर्च होणार नाही. डिस्प्ले सेटिंग किंवा लॉक स्क्रीन सेटिंगमध्ये स्लीप टाइम जास्त असेल तो कमी करा. यामुळे फोनची बॅटरी लवकर संपणार नाही.

आपण एकाच वेळी अनेक अॅप्स वापरत असतो. मात्र, अॅप वापरून झाल्यानंतर ते बंद न करता बॅकग्राउंडला तसेच सुरू असतात. काम झाल्यानंतर ते बंद केल्यास बॅटरीचे चार्जिंग सेव्ह राहिल.

फोन वापरत असताना तो गरम होत असल्याचं लक्षात येताच त्याचा वापर थांबवा. फोन गरम झाल्यास बॅटरी वेगानं डिस्चार्ज होते. तसेच फोन गरम होणं धोकादायक असतं.

सोशल मीडिया अॅप तसेच जास्त मेमरीची अॅप्स फोनची बॅटरी आणि रॅम सर्वात जास्त खर्च करतात. यातील नको असलेली अॅप डिलीट करा.

बॅटरी कोणत्या अॅपसाठी जास्त वापरली जाते ते पाहण्यासाठी सर्वप्रथम सेटिंगमध्ये जा. यानंतर सेटिंगमध्ये Storage/Memory हा पर्याय दिला आहे. त्या पर्यायावर क्लिक करा.

Memory वर क्लिक करून ‘memory used by apps’ यामध्ये जाऊन एक लिस्ट तुम्हाला दिसेल. यात रॅममध्ये वापरली गेलेली अॅप्स चार विभागात म्हणजेच 3 तास, 6 तास, 12 तास आणि एक दिवस असे असतील. यामध्ये तुम्हाला दिसेल की कोणतं अॅप रॅमचा किती टक्के वापर करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: technology
First Published: Jul 23, 2019 09:38 PM IST

ताज्या बातम्या