मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

बँकिंग फ्रॉडपासून सावधान; 'या' गोष्टी चुकूनही करू नका

बँकिंग फ्रॉडपासून सावधान; 'या' गोष्टी चुकूनही करू नका

डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शन करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आपल्या बँक अकाउंटबाबत अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं असून सतर्क राहण्याची गरज आहे.

डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शन करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आपल्या बँक अकाउंटबाबत अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं असून सतर्क राहण्याची गरज आहे.

डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शन करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आपल्या बँक अकाउंटबाबत अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं असून सतर्क राहण्याची गरज आहे.

    नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : गेल्या काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉडच्या (Banking Fraud) प्रकरणांत वाढ झाली आहे. डिजिटल बँकिंग (Digital Banking) आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शन (Online transaction) करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आपल्या बँक अकाउंटबाबत अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. बँक ट्रान्झेक्शनबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. फ्रॉडस्टर्स अनेक नवीन पद्धतीने लोकांची ऑनलाईन फसवणूक करत आहेत. स्कॅमर, फिशिंग मेल, एसएमएस आणि फोन कॉल करून लोकांचा पैसा चोरी केला जात आहे. फ्रॉडस्टर्स बँक ऑफिसर, आरबीआय ऑफिसर, इनकम टॅक्स ऑफिसर असं सांगून लोकांची फसवणूक करत आहेत. एवढंच नाही, तर फ्रॉडस्टर्स आता खोटं बँकिंग ऍप्स बनवत असून, अनेक युजर्सकडून अशी खोटी ऍप्स डाऊनलोड केली जातात. युजर्सने खोटी ऍप्स डाऊनलोड केल्यानंतर सायबर फ्रॉडस्टर्स त्यांच्या खात्यात फ्रॉड करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून Reserve Bank of India अनेकदा ऑनलाईन बँकिंगबाबत इशारा देण्यात आला आहे. परंतु ज्या वेगाने लोक इंटरनेट बँकिंगच्या दिशेने जात आहेत, त्याच वेगाने बँकेसंदर्भात फ्रॉड, फसवणूकचं प्रमाणही वाढतं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, ऑनलाईन फसवणूक आणि बँकिंगसंबंधी सर्व व्यवहारांच्या माहितीबाबत ग्राहकांना जागरुक करत आहे. आरबीआयने, RBIच्या नावाने येणाऱ्या ईमेलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आरबीआयच्या नावाने येणारे ईमेल ग्राहकांच्या बँक अकाऊंटमध्ये असलेली कमाई खाली करु शकतात. अलर्ट - नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (National Payments Corporation of India) एक व्हिडिओ शेअर केला आहे. अशाप्रकारच्या फसवणूकीपासून वाचण्यासाठी लोकांना अलर्ट केलं आहे. - डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती कोणासोबतही शेअर करू नका. त्याशिवाय फोनवर आलेले वन टाइम पासवर्ड (OTP), यूनिफाईड पेमेंट इंटरफेस आईडी (UPI ID) आणि पिन असे डिटेल्स शेअर करू नका. - सिम स्वॅप (SIM Swap) किंवा स्पूफिंग (Spoofing)अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी बँकिंग डिटेल्स कोणत्याही नंबरवर शेअर करू नका. - सिक्योर पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट करा. - सोशल मीडियावर ट्रान्झेक्शन डिटेल्स शेअर करू नका. - बँक अकाउंटमध्ये अधिकृत ट्रान्झेक्शन फ्रॉड झाल्यास, त्वरित यासंबंधीची माहिती संबंधित बँकेला द्या.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या