Home /News /technology /

Facebook प्रोफाईल फोटोचा गैरवापर होण्यापासून टाळण्यासाठी करा या सेटिंग, सुरक्षित राहिल अकाउंट

Facebook प्रोफाईल फोटोचा गैरवापर होण्यापासून टाळण्यासाठी करा या सेटिंग, सुरक्षित राहिल अकाउंट

तुमच्या अकाउंटचा चुकीचा वापर होऊ नये यासाठी फेसबुकमध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग देण्यात आल्या आहेत. या सेटिंग्सचा वापर करुन फेसबुक प्रोफाईल, प्रोफाईल फोटो सुरक्षित ठेवता येईल.

  नवी दिल्ली, 28 जून : संपूर्ण जगभरात कोट्यवधी लोक फेसबुकचा (Facebook) वापर करतात. फेसबुकद्वारे अनेक नातेवाईक, मित्र परिवाराशी कनेक्ट राहता येतं. फेसबुकद्वारे जगभरातील अनेक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहचत असतात. परंतु अनेक लोक सोशल नेटवर्किंग साईट्सचा चुकीचा वापरही करतात. अनेकदा फेसबुक प्रोफाईलला (Facebook Profile Photo) ठेवलेला फोटो डाउनलोड करुन त्याचा चुकीचा वापर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तुमच्या अकाउंटचा चुकीचा वापर होऊ नये यासाठी फेसबुकमध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग देण्यात आल्या आहेत. या सेटिंग्सचा वापर करुन फेसबुक प्रोफाईल, प्रोफाईल फोटो सुरक्षित ठेवता येईल. पिक्चर गार्ड - फेसबुक प्रोफाईल फोटो कोणीही डाउनलोड करू नये किंवा सेव्ह करू नये यासाठी फेसबुककडून हे पिक्चर गार्ड सेफ्टी फीचर देण्यात आलं आहे. पिक्चर गार्ड लावल्यानंतर कोणीही तुमचा प्रोफाईल फोटो डाउनलोड किंवा सेव्ह करू शकत नाही.

  (वाचा - तुमच्या नावाने सेक्स रॅकेट तर चालत नाही ना? असा होतोय तरुणींच्या FB फोटोचा गैरवापर)

  प्रोफाईल लॉक - प्रोफाईल लॉक केल्याने फेसबुकवर तुमच्या फ्रेंड लिस्ट कोणीही व्यक्ती तुमचे फोटो किंवा प्रोफाईल पाहू शकत नाही. प्रोफाईल लॉक करण्यासाठी Facebook App मध्ये More ऑप्शनमध्ये तीन लाईन्सवर करा. यात सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर प्रायव्हसी ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल लॉकिंग ऑप्शन दिसेल. Lock your profile वर क्लिक केल्यानंतर फेसबुक प्रोफाईल लॉक होईल आणि तुमचं प्रोफाईल केवळ तुमचे Facebook Friends पाहू शकतील.

  (वाचा - Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता फेसबुक वापरण्यापूर्वी करावं लागेल हे काम)

  तुमचं फेसबुक अकाउंट कसं सुरक्षित ठेवाल - - तुमची फ्रेंडलिस्ट स्वत:साठीच ओपन ठेवा. तुमचे फ्रेंड्स इतरांना दिसू नये यासाठी who can see your friend list मध्ये only me हा पर्याय निवडा. - फोटो, व्हिडीओ डाउनलोड न होण्यासाठी lock your profile वर क्लिक करा. - अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठीचा पर्याय बंद करा. केवळ friends of friends हा पर्याय ठेवा. - तसंच फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी two-factor authentication ऑन ठेवा. - तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी इतरांना दिसू नये, यासाठी only me पर्याय निवडा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Facebook, Tech news

  पुढील बातम्या