मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आजीपासून नातवंडांपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेत पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी करू नका ही चूक

आजीपासून नातवंडांपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेत पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी करू नका ही चूक

एकीकडे कॅशलेस पेमेंट्स वाढत असताना Cyber Crime च्या घटनांचा ग्राहकांना नेहमीच मोठा धोका असतो. अशावेळी ग्राहकांनी बँक खात्याच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं ठरतं.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : सध्याच्या काळात दैनंदिन व्यवहारांमध्ये ऑनलाईन पेमेंट्सचं (Online Payments) प्रमाण सातत्याने वाढत आहे. सर्व व्यवहार हे घरबसल्या स्मार्टफोनमधील पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून होत आहेत. एकीकडे कॅशलेस पेमेंट्स वाढत असताना Cyber Crime च्या घटनांचा ग्राहकांना नेहमीच मोठा धोका असतो. अशावेळी ग्राहकांनी बँक खात्याच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं ठरतं.

National Crime Records Bureau च्या रिपोर्टनुसार 2019 आणि 2020 च्या दरम्यान देशात Cyber Crime च्या घटनांमध्ये 11.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यासाठी HDFC बँकेने खातेधारकांचा यापासून होण्यासाठी काही गाइडलाइन्सही जारी केलेल्या आहेत. धोकादायक प्रकरणांपासून ग्राहकांना डेटा आणि सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे.

स्मार्टफोन 15 दिवस वापरा, आवडला नाही तर परत करा; Flipkart ची धमाकेदार ऑफर

या गोष्टींची घ्या काळजी -

- अनोळखी कॉल्समध्ये 'बँक कर्मचारी बोलतोय' असं सांगणाऱ्यांपासून सावध रहा.

- विमा Agent च्या विम्याच्या फसव्या ऑफरला बळी पडू नका.

- आरोग्य कर्मचारी म्हणून कुणीही डेटा मागितला तर देऊ नका.

- Customer care किंवा सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून अकाउंटसंबंधीत गोपनीय माहिती विचारली तर देऊ नका.

तुमच्या Debit Card चा PIN कसा कराल सेट? वाचा सोपी प्रोसेस

वरील प्रकरणांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही कॉल्सला प्रतिसाद देऊ नका, ज्यात तुमची प्रायव्हेट माहिती किंवा बँक खात्याशी निगडीत माहिती विचारली जात असेल. कारण बँक कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी कधीही ग्राहकांना फोन करून कुठलीही माहिती विचारत नाही.

आता कॅश, कार्ड नाही तर चेहऱ्यानेच होणार Payment, वाचा काय आहे ही भन्नाट सिस्टम

आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी -

- आपल्या डेबिट कार्डाचा पिन किंवा OTP कधीही कुणालाही शेयर करू नका.

- अनोळखी लिंकवर चुकूनही क्लिक करू नका.

- बँकेचे व्यवहार किंवा इतर योजनांच्या माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

- कुणालाही मेसेज, इमेल किंवा फोनद्वारे गोपनीय माहिती शेयर करू नका.

First published:

Tags: Crime, Crime news, Cyber crime