मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook वर तुमचा डेटा कसा सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Facebook वर तुमचा डेटा कसा सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

डेटा लीक, सायबर अटॅक अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी फेसबुक अकाउंट सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं.

डेटा लीक, सायबर अटॅक अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी फेसबुक अकाउंट सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं.

डेटा लीक, सायबर अटॅक अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी फेसबुक अकाउंट सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं.

    नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : कोरोना काळात सायबर क्राईमच्या (Cyber Crime) प्रकरणांत मोठी वाढ झाली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी फेसबुक डेटा लीक (Facebook Data Leak) प्रकरणही समोर आलं होतं. फेसबुकसह इतरही अनेक सोशल मीडिया साईट्सवर (Social Media Sites) सर्वच जण फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. फेसबुकसारख्या साईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशात डेटा लीक, सायबर अटॅक अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी फेसबुक अकाउंट सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं. पासवर्ड - पासवर्ड (Password) ठेवताना नेहमी काळजी घेणं आवश्यक आहे. पासवर्ड मोठा आणि स्पेशल कॅरेक्टर, स्मॉल-कॅपिटल लेटर, न्यूमरिक असा एकत्रित असावा. यामुळे फेसबुक पासवर्ड हॅक करणं कठीण जातं. मेसेंजर - ज्यावेळी युजर फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) इन्स्टॉल करतात, त्यावेळी इतर परमिशनसह मेसेज वाचण्याचीही परमिशन मागितली जाते. इथे अशी परमिशन देऊ नये. तसंच यात तुमचा मोबाईल नंबर देण्याचाही प्रयत्न करावा. लॉग-इन डिव्हाईस - ज्यावेळी युजर मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवर फेसबुक अकाउंट लॉग-इन करतील, त्यावेळी इथे लॉग-इन डिव्हाईसची संपूर्ण लिस्ट दिसेल. Settings and privacy वर क्लिक करुन settings and security वर जावं लागेल. इथे सर्वात वर डिव्हाईसची लिस्ट दिसेल, जिथे तुम्ही लॉग-इन केलं असेल. इथे लोकेशन, IP अॅड्रेस, ब्राउजरबाबत माहिती मिळेल. ईमेल लॉग-इन - या फीचरची महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यावेळी कोणी दुसरा व्यक्ती एखाद्या ब्राउजरवरुन किंवा अॅपवरुन तुमचं अकाउंट लॉग-इन करेल, त्यावेळी युजरला मेसेज येईल. जर तुम्ही लॉग-इन केलं नसेल, तर लगेच पासवर्ड बदला. हे फीचर अॅक्टिव्ह करण्यासाठी Security and Login मध्ये जावं लागेल. इथे स्क्रॉल डाउन करुन setting up extra security>Get alert about unrecognized login वर क्लिक करुन ते ऑन करावं लागेल. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन - फेसबुकमध्ये लॉग-इनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) अतिशय सुरक्षित मानलं जातं. यात फेसबुक युजरच्या मोबाईलवर एक कोड पाठवतो. योग्य कोड भरल्यानंतरच नव्या अॅप किंवा ब्राउजरवरुन लॉग-इन करता येतं. यासाठी सर्वात आधी Security and Log in सेक्शनमध्ये जावं लागेल. इथे फेसबुक अकाउंटच्या सिक्योरिटीपासून संपूर्ण फीचर्स दिसतील. इथे मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करता येईल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Facebook, Tech news

    पुढील बातम्या