मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमची कार ठेवा Coronavirus फ्री; जाणून घ्या सोप्या टीप्स

तुमची कार ठेवा Coronavirus फ्री; जाणून घ्या सोप्या टीप्स

अतिशय अत्यावश्यक कामासाठी गाडी बाहेर घेऊन जावं लागत असल्यास, सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस कारच्या संपर्कातही येऊ शकतो. हा व्हायरस प्लॅस्टिक आणि मेटलच्या सरफेसवर काही काळासाठी जिवंत राहू शकतो. त्यामुळे कारची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

मुंबई, 26 एप्रिल : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात कुठे ऑक्सिजन, तर कुठे बेड्सची मोठी कमतरता आहे. अशा परिस्थितीत उगाच घराबाहेर न पडणं सर्वांच्याच फायद्याचं आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर जातानाही सतत मास्क लावणं, हात सॅनिटाईज करणं हाच उपाय आहे. अतिशय अत्यावश्यक कामासाठी गाडी बाहेर घेऊन जावं लागत असल्यास, सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस कारच्या संपर्कातही येऊ शकतो. हा व्हायरस प्लॅस्टिक आणि मेटलच्या सरफेसवर काही काळासाठी जिवंत राहू शकतो. त्यामुळे कारची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

- गाडीचे संवेदनशील पार्ट डोर हँडल्स, स्टेअरिंग व्हिल, गियर नॉब, विंडशिल्ड, सीट्स, AC वेंट्स या पार्ट्सकडे विशेष लक्ष द्यावं. गाडीच्या बाहेरील भागाची सफाई करण्यासाठी क्लिनिंग डिस्इंफेक्ट स्प्रेचा वापर करू शकता. हा स्प्रे बाजारात सहजपणे उपलब्ध आहे. तसंच गाडीच्या आतील भागाची, इंटीरियरची सफाई करण्यासाठी अल्कोहल बेस्ड सॅनिटायजरचा वापर करता येऊ शकतो.

- डिस्इंफेक्ट स्प्रेचा वापर करण्याआधी वेट वायपरने अशा भागाची सफाई करा, जे हाताच्या अधिक संपर्कात येतात. गियर नॉब, स्टेअरिंग व्हिल, डॅशबोर्ड, रियर व्ह्यू मिरर, कप होल्डर, सीट बेल्ट आणि सॉकेट असे भाग. वेट वायपरने हे पार्ट्स स्वच्छ केल्यानंतरच डिस्इंफेक्ट स्प्रे किंवा अल्कोहल बेस्ड सॅनिटाईजरचा वापर करा.

(वाचा - मुंबईत या ठिकाणी उभं राहणार Tesla चं भारतातील पहिलं शोरूम)

- गाडी वेळोवेळी वॅक्यूम क्लिनरनेही साफ करणं गरजेचं आहे.

- गाडीतून सहजपणे बाहेर येणारे डोर मॅट्स, सीट कव्हर यासारख्या गोष्टींची वेळोवेळी साफसफाई करा. हे भाग साफ करण्यासाठी डिटर्जेंट किंवा शम्पूचा वापर करता येऊ शकतो.

- जर गाडीतील सीट्सला लेदर अपहोल्स्ट्री असेल, तर याच्या सफाईसाठी स्पेशल क्लिनरची गरज भासेल. घरी बेकिंग सोडा आणि गरम पाण्याचं मिश्रण करुन ब्रशच्या साहाय्याने सीट्स साफ करू शकता.

First published:

Tags: Car, Coronavirus