Home /News /technology /

Instagram वर असा Restore करा डिलीट झालेला डेटा, पाहा सोपी प्रोसेस

Instagram वर असा Restore करा डिलीट झालेला डेटा, पाहा सोपी प्रोसेस

इन्स्टाग्रामवरुन डिलीट झालेला कंटेंट पुन्हा मिळवण्यासाठी लहानशी ट्रिक फायद्याची ठरेल. पण यासाठी इन्स्टाग्राम लेटेस्ट वर्जनचा वापर करणं गरजेचं आहे.

  नवी दिल्ली, 2 मे : फोटो शेअरिंग App इन्स्टाग्राम (Instagram) अतिशय पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. टिकटॉकनंतर इन्स्टाग्रामवरील रील फीचर ट्रेंडमध्ये आहे. अनेक युजर्स आपला सर्वाधिक वेळ या App वर घालवताना दिसतात. काही वेळा चुकून युजर्सचा कंटेंट डिलीट होतो किंवा काही जण कंटेंट डिलीटही करतात. अशावेळी इन्स्टाग्रामवरुन डिलीट झालेला कंटेंट पुन्हा मिळवण्यासाठी लहानशी ट्रिक फायद्याची ठरेल. पण यासाठी इन्स्टाग्राम लेटेस्ट वर्जनचा वापर करणं गरजेचं आहे. इन्स्टाग्राम अपडेट नसेल तर ते प्लेस्टोरवरुन अपडेट करता येईल. त्यानंतर इन्स्टावरुन डेटा रिस्टोर करता येईल.

  हे वाचा - तुमच्या Aadhaar Card चा कोणी चुकीचा वापर करतंय का? सोप्या पद्धतीने अशी मिळेल माहिती

  असा करा डेटा रिस्टोर - - सर्वात आधी उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. - आता वरच्या उजव्या बाजूला More ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करुन Setting मध्ये जा. - त्यानंतर Account वर क्लिक करा. - आता Recently Deleted चा पर्याय सिलेक्ट करा. - जर तुम्ही नुकताच एखादा कंटेंट डिलीट केला असेल तर तो तिथे दिसेल. जर काही डिलीट केलं नसेल तर हा पर्याय दिसणार नाही. - आता असा कंटेंट सिलेक्ट करा, जो तुम्हाला रिस्टोर करायचा आहे किंवा परमनेंटली डिलीट करायचा आहे. यात प्रोफाइल पोस्ट, व्हिडीओ, रील, आर्काइव स्टोरीज रिस्टोर करता येतात. - त्यानंतर More ऑप्शनवर क्लिक करुन रिस्टोर टू प्रोफाइल, रिस्टोर टू कंटेंट डिलीट इट या पर्यायावर क्लिक करा.

  हे वाचा - काय आहे Digital Detox? तुमच्या आयुष्यावर असा होतो परिणाम, या गोष्टी लक्षात ठेवाच

  तुमचं Instagram App अपडेट असल्यास, डाउनलोड असल्यास हा पर्याय दिसेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Instagram, Instagram post, Tech news

  पुढील बातम्या