मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्या फोटोतून बॅकग्राउंड हटवायचं आहे किवा नवं टाकायचं आहे? कोणत्याही थर्ड पार्टी App शिवाय वापर सोपी प्रोसेस

तुमच्या फोटोतून बॅकग्राउंड हटवायचं आहे किवा नवं टाकायचं आहे? कोणत्याही थर्ड पार्टी App शिवाय वापर सोपी प्रोसेस

आता केवळ एका क्लिकवर फोटोतील बॅकग्राउंड हटवता येऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणत्याही App ची गरज नाही.

आता केवळ एका क्लिकवर फोटोतील बॅकग्राउंड हटवता येऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणत्याही App ची गरज नाही.

आता केवळ एका क्लिकवर फोटोतील बॅकग्राउंड हटवता येऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणत्याही App ची गरज नाही.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : Photo मधून बॅकग्राउंड हटवण्यासाठी फोटोशॉप एक्सपर्स्ट्सची गरज होती. पण आता केवळ एका क्लिकवर फोटोतील बॅकग्राउंड हटवता येऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणत्याही App ची गरज नाही. अनेक वेबासाइट्सच्या मदतीने तुम्ही सहजपणे फोटोतील बॅकग्राउंड रिमूव्ह करू शकता. यासाठी फोटो वेबसाइटवर अपलोड करावा लागेल आणि 10 सेकंदाहून कमी वेळेत फोटोतील बॅकग्राउंड रिमूव्ह करता येईल. त्यानंतर दुसरं कोणतंही बॅकग्राउंड आपल्या बॅकग्राउंडसह सेट करू शकता.

लपून-छपून कोण पाहतंय तुमचं Facebook Profile? असं तपासा

यासाठी slazzer.com किंवा remove.bg सारख्या वेबसाइटचा वापर करता येईल. या वेबसाइट्स AI पावर्ड अल्गोरिदमचा वापर करुन फोटोतून बॅकग्राउंड क्लियर करुन त्याला PNG फाइल बनवता येते. - सर्वात आधी ब्राउजर ओपन करुन slazzer.com किंवा remove.bg ओपन करावं लागेल. या साइट्स फोन किंवा पीसी कशातही ओपन करता येऊ शकते. वेबासाइटच्या होमपेजवर बॅकग्राउंड रिमूव्हल फीचर दिसेल.

गुगलवर फक्त तुम्हाला हवं तेच सापडेल; Google Search करताना ही ट्रिक एकदा वापराच

- इथे फोटो अपलोड करावा लागेल. अपलोडनंतर फाइल मॅनेजरमध्ये फोटो सिलेक्ट करा, ज्याचं बॅकग्राउंड रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर फोटो वेबसाइटवर अपलोड करा. - त्याशिवाय एखाद्या वेबासाइटवर असलेली फोटोची लिंकही इथे टाकता येते. फोटो सिलेक्ट केल्यानंतर अपलोडिंगचा प्रोग्रेस बार दिसेल. फोटो अपलोड झाल्यानंतर फोटो प्रीव्ह्यू बॅकग्राउंडसह पाहता येईल.

Smartphone चोरी झाला? या नंबरच्या मदतीने पुन्हा मिळवू शकाल, काय आहे IMEI Number

- फोटो योग्य न वाटल्यास, Edit पर्यायात काही बदलही करता येतात. या प्रोसेसनंतर फोटो डाउनलोडवर क्लिक करा आणि सेव्ह करा. अशाप्रकारे तुम्ही बॅकग्राउंड नसलेला फोटो सेव्ह करू शकता.
First published:

Tags: Tech news, Trending photo

पुढील बातम्या