नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : Google Drive युजर्सला आपल्या फाइल्स, डॉक्युमेंट्स आणि मीडिया फाइल्स स्टोर करण्याची सुविधा देतं. काही वेळा आपल्या फोन किंवा PC मधून गुगल ड्राइव्हचा वापर करताना, काही फाइल्स डिलीट केल्या जातात. त्यानंतर त्या फाइल्सची गरज पडते. अशावेळी फाइल्स रिकव्हर करता येतात.
Google Drive Storage -
Google 15GB स्टोरेज आपल्या युजर्सला फ्रीमध्ये देतं. त्यानंतर असणाऱ्या स्टोरेजसाठी पैसे चार्ज केले जातात. 100GB साठी 130 रुपये, 200GB साठी 210 रुपये आणि प्रीमियम प्लॅनअंतर्गत 2TB स्टोरेजसाठी Google 650 रुपये चार्ज करतं.
हे सर्व प्लॅन गुगल वन सब्सक्रिप्शन अंतर्गत मिळतील. हे प्लॅन फॅमिली शेअरसाठीही सपोर्ट करतात. म्हणजेच हे युजर आपल्या फॅमिलीसोबतही शेअर करू शकतात.
अनेकदा चुकून एखादी महत्त्वाची फाइलही डिलीट होते. त्यानंतर त्या फाइलची गरज लागते आणि फाइल अनेक फोनमध्ये रिकव्हर करता येत नाही.
युजरने डिलीट केलेली फाइल 30 दिवसांपर्यंत Google Drive च्या ट्रॅशमध्ये पडून असते. या काळात युजर ती फाइल रिकव्हर करू शकतात. परंतु एकदा ट्राशमधूनही फाइल डिलीट झाली, तर ती पुन्हा कधीही रिकव्हर करता येत नाही.
डिलीट फाइल्स कशा रिकव्हर करता येतील?
- सर्वात आधी Google Drive मध्ये जावून Trash Icon वर टॅप करा.
- इथे डिलीट केलेल्या सर्व फाइल्स दिसतील.
- जी फाइल पुन्हा हवी आहे, स्टोर करायची आहे, त्या फाइलवर राइट क्लिक करुन किंवा खाली असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- त्यानंतर ती फाइल ट्राशमधून निघून जिथे होती तिथे पुन्हा स्टोर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.