नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : Instagram पॉप्युलर फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग App आहे. तरुणांमध्ये Instagram ची मोठी लोकप्रियता आहे. युजर्स या App वर सर्वाधिक वेळ एक्सप्लोर पेजवर (Instagram Explore Page) घालवतात, अशी माहिती आहे. काही वेळा चुकून एखादी शेअर केलेली पोस्ट डिलीट होते. जर तुमच्याकडूनही चुकून एखादी Instagram Post डिलीट झाली असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. डिलीट झालेली इन्स्टाग्राम पोस्ट पुन्हा रिकव्हर करता येते.
डिलीट झालेली Instagram Post कशी कराल रिकव्हर?
- Instagram App ओपन करा आणि तुमच्या Profile वर जा.
- App च्या उजव्या बाजूला तीन लाइन्सचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- इथे Recently Deleted हा ऑप्शन दिसेल. इथे ऑप्शन दिसला, नाही तर Search बॉक्समध्ये सर्च करता येईल.
- Search बॉक्समध्ये अशा पोस्ट दिसतील, ज्या डिलीट झाल्या आहेत.
- आता ज्या पोस्ट रिकव्हर करायच्या आहेत, त्या सिलेक्ट करा.
- Post Recover करताना तुमच्या फोनवर एक OTP येईल.
- OTP टाकल्यानंतर डिलीट झालेल्या पोस्ट रिकव्हर होतील.
या गोष्टी लक्षात ठेवा -
- महत्त्वाची बाब म्हणजे Instagram Deleted Post केवळ 30 दिवसांपर्यंत Recently deleted या सेक्शनमध्ये दिसतात.
- केवळ 30 दिवसांमध्येच डिलीट झालेल्या इन्स्टाग्राम पोस्ट रिकव्हर करता येऊ शकतात.
- 30 दिवसांनंतर Deleted Post कायमसाठी डिलीट होईल. त्यानंतर Recently deleted सेक्शनमधून डिलीट झालेल्या पोस्ट पुन्हा कधीही रिकव्हर करता येणार नाहीत.
दरम्यान, Instagram मध्ये एक खास फीचर आहे. यामुळे युजरने इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवला याची माहिती मिळते. हे टाईम स्पेंड रिमाइंडर (Set Time Reminder) सेट करण्यासाठी प्रोफाईलमध्ये बदल करता येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Instagram post, Tech news