पावसात तुमचा फोन, टॅब, लॅपटॉप कसा ठेवाल सुरक्षित, वाचा सोप्या Tips

पावसात तुमचा फोन, टॅब, लॅपटॉप कसा ठेवाल सुरक्षित, वाचा सोप्या Tips

मुसळधार पावसातून कामाला जाताना लॅपटॉप, मोबाईल सांभाळणं मोठं कठीण ठरतं. कधी मोबाईल, लॅपटॉप पावसामुळे भिजतोही. अशा वस्तू पाण्यामुळे खराब झाल्याने मोठा खर्च होऊ शकतो. परंतु काही सावधगिरी बाळगल्यास, काही गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमच्या गॅजेट्सचं नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जून: पावसाला आता सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी घरुनच काम करत आहेत. तर काही लोकांना मात्र दररोज ऑफिसला जावं लागतंय. मुसळधार पावसातून कामाला जाताना लॅपटॉप, मोबाईल सांभाळणं मोठं कठीण ठरतं. कधी मोबाईल, लॅपटॉप पावसामुळे भिजतोही. अशा वस्तू पाण्यामुळे खराब झाल्याने मोठा खर्च होऊ शकतो. परंतु काही सावधगिरी बाळगल्यास, काही गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमच्या गॅजेट्सचं नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो.

मुसळधार पावसात एखाद्याचा फोन आल्यास, अशावेळी पॉकेटमधून फोन काढून तो रिसिव्ह करणं फोनसाठी धोक्याचं ठरू शकतं. फोन हातातून पडू शकतो किंवा पावसाच्या पाण्यात भिजूही शकतो. त्यामुळे पावसात फोन कॉल रिसिव्ह करण्यासाठी ब्लूटूथ किंवा इयरफोनचा वापर करा. अधिकतर ब्लूटूथ हँडसेट वॉटरप्रुफ असतात. त्यामुळे कव्हर किंवा बॅगमध्ये ठेवलेला फोन, टॅब पाण्यापासून सुरक्षित राहील.

झिप पाऊच -

पावसाळ्यात झिप पाऊच अतिशय महत्त्वाचे ठरतात. प्लास्टिकचं हे पाऊच वॉटरप्रुफ असतं आणि अतिशय कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहे. मुसळधार पावसात या पाऊचमध्ये तुमचा फोन सुरक्षित ठेऊ शकता.

वॉटरप्रुफ कव्हर -

वॉटरप्रुफ कव्हरही फोन सुरक्षित ठेवण्यासाठीचा चांगला पर्याय आहेत. परंतु असे कमी कव्हर बाजारात उपलब्ध आहेत.

(वाचा - Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

बॅटरी -

जर फोनमध्ये थोडं जरी पाणी गेलं, तर ते सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर अजिबात करू नका. यामुळे फोनमध्ये अतिशय हलके कंपोनेंट असतात ते खराब होऊ शकतात.

फोनमध्ये पाणी गेलं तर, फोन सर्वात आधी स्विच ऑफ करा. त्यानंतर फोन तांदळात ठेवावा. तांदुळ फोनमध्ये असलेलं पाणी सुकवण्याचं काम करतं. काही वेळानंतर फोन बाहेर काढा आणि त्यानंतर ऑन करा.

(वाचा - तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा)

चार्जर -

फोनमध्ये थोडं जरी पाणी गेलं असेल, तर त्यावेळी चार्जचा वापर करू नका. कारण जराशीही घाईगडबड फोन पूर्णपणे डॅमेज करू शकते. पाणी पूर्णपणे सुकल्यानंतरच फोन चार्जिंगला लावा.

(वाचा - WhatsAppमध्ये End-to-end encryption नेमकं आहे तरी काय?जाणून घ्या हे कसं काम करतं)

लॅपटॉप -

पावसात लॅपटॉपसाठी वॉटरप्रुफ बॅगपॅकचा वापरा. जर लॅपटॉप भिजला, तर सर्वात आधी पॉवर बंद करुन बॅटरी, अॅडॉप्टपर काढा. लॅपटॉपचं मागचं कव्हर ओपन करुन तेथेही पाणी असल्यास साफ करा. लॅपटॉप उलटा करून ठेवा, जेणेकरुन डिव्हाईसमध्ये असलेल्या सर्किटपर्यंत पाणी पोहचणार नाही. एखाद्या टिश्यू किंवा अतिशय मुलायम कपड्याने लॅपटॉपचं पाणी सुकवा.

Published by: Karishma Bhurke
First published: June 9, 2021, 4:37 PM IST

ताज्या बातम्या