मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Tips and Tricks: डेबिट कार्डनेही करू शकता क्रेडिट कार्डचं बिल पेमेंट, पाहा प्रोसेस

Tips and Tricks: डेबिट कार्डनेही करू शकता क्रेडिट कार्डचं बिल पेमेंट, पाहा प्रोसेस

तुम्ही कोणत्याही UPI App द्वारे ICICI Credit Card बिलाचं पेमेंट करू शकता.

तुम्ही कोणत्याही UPI App द्वारे ICICI Credit Card बिलाचं पेमेंट करू शकता.

तुम्ही कोणत्याही UPI App द्वारे ICICI Credit Card बिलाचं पेमेंट करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : सध्या बाजारात क्रेड (CRED), पेटीएम (Paytm), मोबिक्विक (Mobikwik), फोनपे (Phonepe), अ‍ॅमेजॉन पे (Amazon Pay) असे अनेक थर्ड पार्टी मोाबाइल अ‍ॅप्लिकेशन आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड बिलाचं (Credit Card Bill) पेमेंट करू शकता. तुम्ही कोणत्याही UPI App द्वारे ICICI Credit Card बिलाचं पेमेंट करू शकता.

UPI App द्वारे ICICI Credit Card बिल भरण्यासाठी काय आहे प्रोसेस?

- सर्वात आधी BHIM, Paytm, Phonepe, Amazon किंवा कोणतंही UPI App ओपन करा.

- Send Money किंवा Send Money To Anyone किंवा Transfer Money यापैकी एकावर क्लिक करा.

- त्यानंतर UPI ID टाकण्याचा ऑप्शन दिसेल.

- आता UPI ID च्या ऐवजी ccpay.16 Digit Credit Card number@icici टाका. त्याला वेरिफाय केल्यानंतर तुमचं नाव न दिसता Credit दिसेल.

- आता अमाउंट टाकून Proceed वर क्लिक करा.

- त्यानंतर UPI App मध्ये लिंक्ड बँक अकाउंटद्वारे UPI PIN टाकून पेमेंट पूर्ण करा.

चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? या उपायांनी मिळवा परत

काय आहे UPI?

यूनिफाइड पेमेंट इंटरफेस/यूपीआय (Unified Payments Interface) एक रियल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जे मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने बँक अकाउंटमध्ये पैसे त्वरित ट्रान्सफर करू शकतात. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एक बँक अकाउंट अनेक यूपीआय अ‍ॅपशी लिंक करू शकतात. त्याशिवाय अनेक बँक अकाउंट एका यूपीआय अ‍ॅपशी कनेक्ट करता येतात.

देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) झपाट्यानं विस्तार होत आहे. त्याच वेळी, भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा पेमेंट प्लॅटफॉर्म, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI - Unified Payments Interface) द्वारे सप्टेंबरमध्ये 6.5 लाख कोटी रुपयांचे एकूण 3.65 अब्ज व्यवहार झालेत. विशेष बाब म्हणजे सलग तिसरा महिना आहे, जेव्हा यूपीआयच्या माध्यमातून 3 अब्जाहून अधिक व्यवहार झालेत.

First published:

Tags: Credit card, Icici bank, Upi