• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • PVC Aadhaar Card कसं आणि किती रुपयांत बनवू शकता? पाहा संपूर्ण डिटेल्स

PVC Aadhaar Card कसं आणि किती रुपयांत बनवू शकता? पाहा संपूर्ण डिटेल्स

UIDAI कडून आता PVC Aadhaar Card ही दिलं जातं. पीव्हीसी आधार कार्ड पाहताना ATM प्रमाणे दिसतं आणि ते फाटण्याचंही टेन्शन नसतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सर्व सरकारी कामांसह खासगी कामांसाठीही आधार नंबरची गरज असते. UIDAI कडून आता PVC Aadhaar Card ही दिलं जातं. पीव्हीसी आधार कार्ड पाहताना ATM प्रमाणे दिसतं आणि ते फाटण्याचंही टेन्शन नसतं.

  आता Offline करु शकता Aadhar Verification, वाचा संपूर्ण प्रोसेस

  कसं बनवता येईल PVC Card - - PVC Card साठी UIDAI च्या वेबसाइटवर जा. - इथे 'My Aadhaar' सेक्शनमध्ये 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा. - त्यानंतर आधारचा 12 अंकी किंवा 16 अंकी व्हर्चुअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट ID टाका. - आता सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा भरा आणि OTP साठी Send OTP वर क्लिक करा. - रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP सबमिट करा. - इथे आधार पीव्हीसी कार्डचा एक प्रीव्ह्यू दिसेल. - त्यानंतर Payment पर्यायावर क्लिक करा. - पेमेंट पेजवर 50 रुपये फी जमा करावी लागेल. - पेमेंट पूर्ण केल्यानंतर Aadhaar PVC Card साठीची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधार संबंधित कोणत्याही समस्येसाठी 1947 वर कॉल करू शकता. इथे आधारसंबंधी सर्व प्रकारच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात.

  Driving License हरवलं? घरबसल्या असं बनवा डुप्लीकेट; पाहा संपूर्ण प्रोसेस

  त्याशिवाय आधार कार्डधारक UIDAI च्या वेबसाइटच्या या https://resident.uidai.gov.in/lost-uideid लिंकवरही एनरोलमेंट ID मिळवू शकता.
  Published by:Karishma
  First published: