Home /News /technology /

दुसऱ्याच्या फोनवर Login राहिलं Facebook? डोंट वरी! घरबसल्या असं करा Logout

दुसऱ्याच्या फोनवर Login राहिलं Facebook? डोंट वरी! घरबसल्या असं करा Logout

अनेकदा एखाद्या दुसऱ्याच्या डिव्हाईसवरुन Facebook लॉगइन केलं जातं आणि ते लॉगआउट करणं विसरलं जातं. यामुळे हॅकिंगचा धोका वाढतो. परंतु या समस्येपासून वाचण्यासाठी फेसबुक सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं, ज्यामुळे अकाउंट सेफ होण्यास मदत होईल.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 25 जून : फेसबुकचे (Facebook) कोट्यवधी युजर्स आहेत. अनेक जण या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु याच्या सेटिंगवरही लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. अनेकदा एखाद्या दुसऱ्याच्या डिव्हाईसवरुन Facebook लॉगइन (Login) केलं जातं. दुसऱ्याच्या डिव्हाईसवर लॉगइन केल्यानंतर घाईगडबडीत ते लॉगआउट (Logout) करणं विसरलं जातं. यामुळे हॅकिंगचा धोका वाढतो. परंतु या समस्येपासून वाचण्यासाठी फेसबुक सेटिंगमध्ये (Facebook Setting) काही बदल करणं फायद्याचं ठरतं, ज्यामुळे अकाउंट सेफ होण्यास मदत होईल. Facebook Account Setting - - अनेक जण फेसबुकचा सर्वाधिक वापर स्मार्टफोनमध्ये करतात. दुसऱ्या फोनमध्ये तुमचं फेसबुक अकाउंट लॉगइन केल्यानंतर, ते लॉगआउट करण्याचं विसल्यास घाबरण्याची गरज नाही. - सर्वात आधी फोनमध्ये Facebook App ओपन करा आणि त्यानंतर सेटिंगमध्ये जा. त्यानंतर सर्वात खाली स्क्रोल करुन, सिक्योरिटी अँड लॉगइनचा (Security and login) पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.

  (वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

  - सिक्योरिटी अँड लॉगइनवर टॅप केल्यानंतर इथे Where you are logged in असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक लिस्ट ओपन होईल, त्यात अशा सर्व डिव्हाईसची माहिती असेल जिथे तुम्ही तुमचं फेसबुक अकाउंट ओपन केलं होतं.

  (वाचा - Private Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात? या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती)

  - या लिस्टमध्ये ज्या डिव्हाईसमधून अकाउंट लॉगआउट करायचं आहे, त्यावर क्लिक करुन लॉगआउट करू शकता. यासाठी तीन डॉटवर क्लिक करावं लागेल आणि ते अकाउंट सिलेक्ट करा, ज्याला लॉगआउट करायचं आहे. एकाच वेळी सर्व डिव्हाईसमधूनही अकाउंट लॉगआउट करता येतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Facebook, Tech news

  पुढील बातम्या