• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • इतर कोणी तुमचा फोन वापरण्याचं टेन्शन आहे? करा हे एक काम, कोणीच पाहू शकत नाही तुमची खासगी माहिती

इतर कोणी तुमचा फोन वापरण्याचं टेन्शन आहे? करा हे एक काम, कोणीच पाहू शकत नाही तुमची खासगी माहिती

कोणी आपला फोन घेऊन पर्सनल मेसेज, चॅट, फोटो पाहू नये यासाठी अनेक जण फोनला सिक्योरिटी कोड ठेवतात. जेणेकरुन त्यांचा फोन कोणीही घेऊन वापरु नये. पण सिक्योरिटी कोड न टाकताही फोन इतरांकडून वापरला जाणार नाही, अशारितीने सुरक्षित ठेवता येतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : अनेक जण आपल्या फोनबाबत (Smartphone) अतिशय सावध असतात. कोणी आपला फोन घेऊन पर्सनल मेसेज, चॅट, फोटो पाहू नये यासाठी अनेक जण फोनला सिक्योरिटी कोडही ठेवतात. जेणेकरुन त्यांचा फोन कोणीही घेऊन वापरु नये. पण तुम्ही सिक्योरिटी कोड न टाकताही फोन इतरांकडून वापरला जाणार नाही, अशारितीने सुरक्षित ठेवू शकता. अँड्रॉईड फोन फीचर - Android Smartphone मध्ये Pin the Screen किंवा Screen Pinning नावाचं खास फीचर आहे. या फीचरचा वापर केल्यानंतर कोणताही दुसरा व्यक्ती तुमच्या मर्जीशिवाय तुमचा फोन वापरु शकत नाही. Android 5.0 आणि त्यानंतरच्या सर्व वर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे. सॅमसंगच्या फोनमध्ये हे फीचर Pin Windows नावाने उपलब्ध आहे. कसं काम करतं हे फीचर? Pin the Screen किंवा Screen Pinning ने तुम्ही कोणतंही अ‍ॅप लॉक किंवा पिन करता, त्यानंतर फोनमध्ये त्या अ‍ॅपशिवाय इतर कोणतेही अ‍ॅप ओपन होणार नाही. जर समजा तुम्ही फोन एखाद्याला ट्विटर वापरासाठी दिला, तर त्याला Pin the Screen किंवा Screen Pinning ने लॉक किंवा पिन करा. त्यामुळे ज्याला तुम्ही फोन दिला आहे, तो ट्विटरशिवाय इतर कोणतंही अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये वापरु शकत नाही.

  Facebook वर तुमचा डेटा कसा सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

  कसा करता येईल वापर - फोन सेटिंगमध्ये Security and Lock स्क्रिन ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. यात Pin the Screen किंवा Screen Pinning पर्याय दिसेल. यावर क्लिक करुन ऑन करा. ज्या अ‍ॅपचा वापर करायचा आहे, त्याला पिन करण्यासाठी ओपन करा आणि पुन्हा बंद करा. त्यानंतर Recent Apps पर्यायात जा, इथे जे अ‍ॅप लॉक करायचं आहे त्यावर लाँग प्रेस करा, Pin ऑप्शन सिलेक्ट करा. आता पिन केलेल्या अ‍ॅपशिवाय इतर कोणतंही अ‍ॅप ओपन होणार नाही.
  Published by:Karishma
  First published: