नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : कोरोना काळात OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या (Netflix) वापरात मोठी वाढ झाली. नेटफ्लिक्स सर्वाधिक वापरला जाणारा OTT प्लॅटफॉर्म आहे. नेटफ्लिक्सचा ID आणि Password आपल्या कुटुंबियांशी, मित्र-परिवाराशी शेअरही करता येतो. अनेकदा तुमचा आयडी, पासवर्ड इतर दुसऱ्याच व्यक्तीच्या हातातही जाऊ शकतो. अशात समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नेटफ्लिक्स अकाउंट सिक्योर करणं फायद्याचं ठरतं. नेटफ्लिक्स अकाउंट लॉकही करता येतं.
Netflix Account कसं कराल सिक्योर?
- सर्वात आधी तुमचं Netflix अकाउंट ओपन करा.
- त्यानंतर ते प्रोफाईल सिलेक्ट करा, जे लॉक करायचं आहे.
- प्रोफाईल सिलेक्ट करण्यासाठी उजव्या बाजूला कॉर्नरमध्ये असलेल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.
- त्यानंतर स्क्रोल डाउन करा आणि Profile & Parental Controls वर टॅप करा.
- इथे प्रोफाईल लॉक करा.
- त्यानंतर तुमचा नेटफ्लिक्स अकाउंट पासवर्ड टाकावा लागेल.
- त्यानंतर Require a PIN चेक बॉक्सवर क्लिक करावं लागेल. जर PIN रिक्वायरमेंट हटवायचं असेल, तर बॉक्स अनचेक करावा लागेल.
- PIN बनवण्यासाठी युजर्सला 4 डिजीट टाकावे लागतील.
- जर एखाद्या अशा डिव्हाईसवर अकाउंट ओपन केलं, जे अनसपोर्टेड आहे, तर त्याला PIN टाकण्याची गरज असेल. तसंच नवीन प्रोफाईल तुमच्या अकाउंटवर क्रिएट केल्यासही PIN टाकावा लागतो.
- हा पर्याय तेव्हाच दिला जाईल, ज्यावेळी मुख्य अकाउंटवर Profile Lock PIN तयार केला जातो.
- ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर Submit वर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.