मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /...तर समजा तुमचा फोन हॅक झालाय! या 10 गोष्टी फोनमध्ये आढळल्यास वेळीच व्हा सावध

...तर समजा तुमचा फोन हॅक झालाय! या 10 गोष्टी फोनमध्ये आढळल्यास वेळीच व्हा सावध

कॉन्टॅक्ट लिस्ट पाहण्यासाठी गुगलच्या होम पेजवर उजव्या बाजूला असलेल्या Gmail जवळील Contacts ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. या सर्व नंबर्सचा बॅकअपही घेता येऊ शकतो. इथे कॉन्टॅक्ट नंबर डिलीट करण्याचाही ऑप्शन दिला जाईल.

कॉन्टॅक्ट लिस्ट पाहण्यासाठी गुगलच्या होम पेजवर उजव्या बाजूला असलेल्या Gmail जवळील Contacts ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. या सर्व नंबर्सचा बॅकअपही घेता येऊ शकतो. इथे कॉन्टॅक्ट नंबर डिलीट करण्याचाही ऑप्शन दिला जाईल.

स्पाय अ‍ॅप आणि टूल तुमच्या डिव्हाईसमध्ये लपतात आणि ओळखता येत नाहीत. परंतु हे ओळखण्यासाठी फोनमध्ये काही वेगळ्या गोष्टी आढळल्यास याची माहिती मिळू शकते.

नवी दिल्ली, 21 जुलै : इंटरनेट युजर्सला हॅकिंग, स्पाय सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्सपासून सावध राहण्याची गरज आहे. काही अ‍ॅप्स तुमच्या फोनमधील फायनान्ससंबंधी माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करतात. तर काही अ‍ॅप्स काही फोटो गॅलरी, कॉल, मेसेज आणि इतरही माहिती चोरी करू शकतात. हे स्पाय अ‍ॅप आणि टूल तुमच्या डिव्हाईसमध्ये लपतात आणि सहजपणे ओळखता येत नाहीत. परंतु हे ओळखण्यासाठी फोनमध्ये काही वेगळ्या गोष्टी आढळल्यास याची माहिती मिळू शकते.

- फोन बॅटरी

जर तुमच्या फोनची बॅटरी सामान्यपेक्षा अधिक वेगाने संपत असेल, तर तुमच्या फोनमध्ये स्पाय अ‍ॅप किंवा स्पाय टूल असण्याची शक्यता निर्माण होते. स्पाय टूल चेक करण्याआधी फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅपची तपासणी करा. बॅकग्राउंडमध्ये सुरू असणारे अ‍ॅप्स बॅटरी लवकर संपवतात. त्यामुळे हे अ‍ॅप्स बंद करा आणि मॉनिटर करा.

- अ‍ॅप्स डाउनलोड

फोनमध्ये असे अ‍ॅप्स दिसत असतील, जे तुम्ही डाउनलोड केले नाहीत, पण तरीही ते फोनमध्ये आहेत. असे अ‍ॅप्स हॅकर्सकडून फोनमध्ये डाउनलोड केले जाऊ शकतात. ते लगेच डिलीट करा.

- स्मार्टफोन स्लो

फोन अतिशय स्लो झाल्यास किंवा सतत थांबत थांबत काम करत असेल, तर फोनच्या बॅकग्राउंडमध्ये स्टील्थ मालवेअर असण्याची शक्यता निर्माण होते.

(वाचा - स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस)

- मोबाईल डेटा

मोबाईल डेटाचा वापर अचानक वाढला असेल, आधीपेक्षा अधिक वापर होत असेल, तर फोनमध्ये स्पाय अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईल डेटाचा वापर करत असल्याची शक्यता असू शकते. इंटरनेटचा वापर करुन ते युजरला ट्रॅक करतात.

- अ‍ॅप्स क्रॅश

जर स्मार्टफोन विचित्रप्रकारे काम करत असेल, तर सावध व्हा. फोनमध्ये अ‍ॅप्स आपोआप क्रॅश होत असतील, किंवा लोड होण्यास समस्या येत असतील, तुमच्या वापरातल्या अनेक साईट नेहमीपेक्षा वेगळ्या दिसत असतील तर हे संकेत फोनमध्ये स्पाय अ‍ॅप काम करत असल्याचे असू शकतात.

- पॉप-अप

स्क्रीनवर विचित्र, भरमसाठ पॉप-अप येत असतील, हे अ‍ॅडवेअरमुळे होऊ शकतं. हे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, जे तुमच्या फोनला जाहिरातींनी भरुन टाकतं. अशा लिंकवर कधीही क्लिक करू नका.

- फोटो- व्हिडीओ

जर फोनच्या गॅलरीमध्ये असे फोटो-व्हिडीओ दिसत असतील, जे तुम्ही कधी घेतलेच नाही, तर सावध व्हा. हे संकेत आहेत की तुमच्या कॅमेरावर कोणाचं नियंत्रण असू शकतं.

(वाचा - Online Railway Ticket बुक करताना येतेय समस्या? घरबसल्या काही सेकंदात करा बुकिंग)

- फ्लॅश लाइटिंग ऑन

फोनचा वापर करत नसाल, तरी फ्लॅश लाईट ऑन होत असेल, हे देखील मोबाईल दुसऱ्याकडून नियंत्रित होत असल्याचा संकेत असू शकतो.

- फोन हिटिंग

अधिक काळ फोन वापरल्यानंतर तो गरम होतो. गेमिंग, नेविगेशन अ‍ॅप सतत वापरल्याने फोन हीट होण्याची समस्या येते. परंतु फोनचा वापर नसतानाही गरम होत असेल, तर हॅकर्स फोनमध्ये काम करत असल्याचे संकेत असू शकतात.

- मेसेज-कॉल्स लॉग

मेसेज किंवा कॉलमध्ये अधिक माहिती दिसत असेल, जी तुम्ही पाठवली नाही तर हॅकर्स तुमच्या फोनचा वापर करत असल्याची शक्यता असू शकते.

First published:
top videos

    Tags: Hacking, Smartphone, Tech news