मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Computer मध्ये आलेला व्हायरस रिकामं करू शकतो बँक अकाऊंट; नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या Safety Tips

Computer मध्ये आलेला व्हायरस रिकामं करू शकतो बँक अकाऊंट; नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या Safety Tips

सायबर गुन्हेगार व्हायरस, फेक कॉल आदींच्या माध्यमातून फसवणूक करत आहेत. बॉटनेट (Botnet) हे त्यापैकीच एक आहे.

सायबर गुन्हेगार व्हायरस, फेक कॉल आदींच्या माध्यमातून फसवणूक करत आहेत. बॉटनेट (Botnet) हे त्यापैकीच एक आहे.

सायबर गुन्हेगार व्हायरस, फेक कॉल आदींच्या माध्यमातून फसवणूक करत आहेत. बॉटनेट (Botnet) हे त्यापैकीच एक आहे.

    नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांत आर्थिक व्यवहार, खरेदी, शासकीय कामं आदी बाबी ऑनलाइन (Online) माध्यमातून करण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. यासाठी युझर्स कम्प्युटर (Computer) आणि स्मार्टफोनचा (Smartphone) वापर करतात. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन, तसंच अन्य कारणांमुळे ऑनलाइन व्यवहारांना विशेष प्राधान्य दिलं गेलं. सायबर गुन्हेगारांसाठी (Cyber Criminal) ही उत्तम संधी ठरली. परिणामी ऑनलाइन व्यवहार काहीसे असुरक्षित होऊन सायबर फ्रॉडचं (Cyber fraud) प्रमाण वाढलं.

    सायबर गुन्हेगार व्हायरस, फेक कॉल आदींच्या माध्यमातून फसवणूक करत आहेत. बॉटनेट (Botnet) हे त्यापैकीच एक आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना युझर्सना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. बॉटनेट हे अशा कम्प्युटरचं नेटवर्क आहे, की ज्याद्वारे कम्प्युटर्समध्ये छेडछाड किंवा हस्तक्षेप केला जातो. बॉटनेटमधल्या डिव्हाइसला बॉट (Bot) असं म्हणतात. जेव्हा कम्प्युटरमध्ये मालवेअर (Malware) प्रवेश करतं, तेव्हा एक बॉट तयार होतो आणि त्यावर थर्ड पार्टीचं (Third Party) नियंत्रण असतं. याबाबतची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने प्रसिद्ध केली आहे.

    बॉटनेट ही सायबर गुन्हेगारीची (Cyber crime) एक पद्धत आहे. त्यामुळे युझर्सनी कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक आहे. सायबर गुन्हेगार बॉटनेटचा वापर अनेक गोष्टींसाठी करतात. यात गुन्हेगारी हेतूंचाही समावेश आहे. बॉटनेटचा सर्वाधिक वापर ई-मेल स्पॅम कॅम्पेन, स्पायवेअरचा प्रसार करण्यासाठी, तसंच डेटा चोरी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे युझर्सनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

    बॉटनेटपासून वाचण्यासाठी एखाद्या चांगल्या सिक्युरिटी अँटीव्हायरसचा (Antivirus) वापर करावा. असा अँटीव्हायरस कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तो अपडेटेड आणि स्विच ऑन राहील याकडं लक्ष द्यावं. कोणत्याही अज्ञात, संशयास्पद आणि अविश्वसनीय ठिकाणाहून आलेल्या ई-मेलमधल्या फाईल्स ओपन करू नयेत. तसंच, अशा ई-मेल्समधल्या लिंकवर क्लिक करू नये. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून आलेले ई-मेलदेखील बऱ्याचवेळा त्यांचा कम्प्युटर व्हायरसनं इन्फेक्ट केला असेल तर धोकादायक ठरू शकतात. कनेक्टेड डिव्हाइसचा (Connected Device) वापर करताना सावधगिरी बाळगावी. कारण त्यांच्यात मालवेअर असू शकतं. सीडी किंवा डीव्हीडीचा वापर करतानादेखील काळजी घ्यावी. कारण त्यामध्येदेखील मालवेअर असू शकतं.

    बॉटनेटमुळे तुमचं नेटवर्क व्हायरस इन्फेक्टेड होतं. सायबर गुन्हेगार या माध्यमातून डेटा आणि ट्रान्झॅक्शन्स अॅक्सेस करू शकतात. किलोगर्सच्या माध्यमातून बॅंकिंग क्रेडिन्शियल (Banking Credentials) चोरी शकतात. कम्प्युटरमध्ये स्पॅम ई-मेलची संख्या वाढवण्यासाठी बॉटनेटचा प्राधान्यानं वापर होतो. तुमच्या कम्प्युटरचा वापर दुसरं डिव्हाइस इन्फेक्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमचा कम्प्युटर क्लिक फ्रॉडसाठी तुमच्या नकळत वापरला जाऊ शकतो. तसंच तो नामांकित वेबसाइट्सवर जाऊन खोटं वेब ट्रॅफिक तयार करू शकतो.

    बॉटनेटमुळे होणारं नुकसान पाहता युझर्सनी आपला कम्प्युटर कसा सुरक्षित राहील याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे.

    First published:

    Tags: Cyber crime