तुमचा स्मार्टफोन आणि डेटा 'असा' ठेवा सुरक्षित!

अॅपच्या माध्यमातून तुमची प्रोफाइल आणि डेटा कंपनीला वापरण्यासाठी आपण नकळत परवानगी देत असतो आणि यामुळे आपला डेटा चोरी होण्याची शक्यता असते.

  • Share this:

सध्या सोशल मीडियावर फेस अॅप धुमाकूळ घालत आहे. पण या अॅपच्या माध्यमातून तुमची प्रोफाइल आणि डेटा कंपनीला वापरण्यासाठी आपण नकळत परवानगी देत आहे. यामुळं डेटा चोरीसुद्धा होऊ सकतो. यापासून स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी तुम्ही करू शकता.

मोबाईलवर अॅप वापरताना ते सुरक्षित आहेत याची खात्री करा. ज्यामध्ये इन्क्रिप्शन असेल त्यातून केलंल चॅट कोणीही वापरू शकत नाही. अॅपलचे iMessage आणि फेसबुक, व्हॉटसअॅपला एंड टू एंड इन्क्रिप्शन फीचर आहे.

स्मार्टफोन अॅपचे सतत अपडेट येत असतात. यामध्ये काही बग्स असतील तर ते काढून टाकण्याचं काम केलं जातं. त्यामुळं अॅपचे अपडेट आले असतील तर लगेच करून घ्या.

नवीन अॅप इन्स्टॉल करताना अनेक गोष्टींची परवानगी मागितली जाते. यात तुमच्या फोनचा स्पीकर, कॅमेरा याशिवाय संपर्क, जीपीएस लोकेशन, मीडिया फाइल यांचाही समावेश असतो. यामुळे कोणत्याही अॅपला इन्स्टॉल करण्यापूर्वी त्या अॅपद्वारे आपली माहिती गोळा केली जात नाही ना हेसुद्धा बघायला हवं.

सोशल मीडिया अॅप्स  आणि इतर ऑनलाइन अकाउंटचे पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण काम असतं. एकच पासवर्ड ठेवणं धोक्यांच ठरतं त्यामुळे यासाठी पासवर्ड मॅनेजरचा वापर करता येईल. त्यामुळं पासवर्ड विसरण्याचा तसेच त्यामुळं बदलण्याची वेळ येणार नाही.

आपण अनेकदा वाय-फाय नेटवर्कवर स्मार्टफोन वापरतो. त्यावरून आपली माहिती शेअर होण्याची शक्यता असते. ती होऊ नये यासाठी वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करा. यामुळे सुरक्षित वायफाय मिळतं आणि फोनचं लोकेशन आणि ओळख उघड होत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 09:57 PM IST

ताज्या बातम्या