तुमच्या फोनमध्ये मिळवा अनलिमिटेड स्पेस; हा आहे स्मार्ट उपाय!

फोनमधील फोटो आणि व्हिडिओ किंवा तुम्हाला आवश्यक असलेल्या फाईल्स डिलिट न करता देखील जागा निर्माण करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 08:55 AM IST

तुमच्या फोनमध्ये मिळवा अनलिमिटेड स्पेस; हा आहे स्मार्ट उपाय!

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट: स्मार्टफोन म्हटले की अनेक अॅप्स असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी सहज करता येत असल्यामुळे स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप आपण वापरत असतो. तसेच स्मार्टफोनमध्ये कॅमेरा देखील अधिक चांगला असल्यामुळे फोटो देखील भरपूर काढले जातात. पण या सर्व गोष्टीमुळे तुमच्या फोनची मेमरी भरता आणि त्यानंतर काहीच करता येत नाही. सध्या 10 ते 12 हजार रुपयापर्यंत असे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत ज्यामध्ये चांगल्या पिक्सलचे कॅमेरे असतात. फोनमधील फोटो आणि व्हिडिओमुळे मेमरी फुल होते.

तुमच्या फोनची मेमरी जेव्हा फुल होते तेव्हा अनेक वेळा तो हॅग होतो किंवा त्यातील काही अॅप काम करत नाहीत. अशा वेळी तुम्ही फोनमधील हवे असलेले फोटो किंवा व्हिडिओ डिलिट देखील करू शकत नाहीत. मोबाईलमधील हे फोटो आणि व्हिडिओ सर्वाधिक जागा घेतात. तसेच प्रत्येक वेळी हे फोटो आणि व्हिडिओ डिलिट करून तुम्ही जागा देखील करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही फोनमधील फोटो आणि व्हिडिओ किंवा तुम्हाला आवश्यक असलेल्या फाईल्स डिलिट न करता देखील जागा निर्माण करू शकता.

तुमच्या फोनमधील अधिक जागा निर्माण करण्यासाठी हे करा

- फोनमधील बॅकअप मोड या पर्यायावर जा तेथे हाय क्वालिटी हा पर्याय निवडा

- त्यानंतर गुगल फोटो अॅप ओपन करा

Loading...

- या अॅपच्या उजव्या कोपऱ्यावर असेल्या 3 डॉटवर क्लिक करा

- तेथील Settings या पर्यायावर जा

- त्यानंतर Backup mode हा पर्याय निवडून त्यातील High quality या पर्यायावर क्लिक करा

- यानंतरची अखेरची स्टेप म्हणजे Back up device folders या ठिकाणी जाऊन सर्व फोल्डर्स सिलेक्ट करा ज्यांना तुम्हाला या Backupमध्ये ठेवायचे आहे.

तुमच्या फोनमध्ये अशा प्रकारे अनलिमिडेट जागा मिळवण्यासाठी गुगल फोटोज अॅपचे सर्वात अपडेट व्हर्जन (4.15) डाऊनलोड करा. अशा प्रकारे Backup घेताना इंटरनेट कनेक्शनची गरज लागते.

SPECIAL REPORT : तब्बल आठवड्यानंतर कोल्हापूर महामार्ग झाला मोकळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: smartphone
First Published: Aug 12, 2019 10:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...