नवी दिल्ली, 5 जुलै : आजकाल प्रत्येक घरात इन्व्हर्टरची (Inverter Battery) छोटी-मोठी गरज भासते. लोक चांगल्या इन्व्हर्टरवर खर्च तर करतात, परंतु ज्यावेळी बॅटरी बदलण्याची किंवा नवी बॅटरी खरेदी करण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र अनेक लोक याबाबतीत लोकल बॅटरी खरेदी करताना दिसतात. अशा बॅटरीची किंमत कमी असल्याने काही प्रमाणात लोकांचा लोकल बॅटरी खरेदी करण्याकडे कल असतो.
लोकल बॅटरी आणि ब्रँड बॅटरी -
लोकल ब्रँड आवश्यक सेफ्टी स्टँडर्डचं पालन करत नाही. यामुळे बॅटरीचं लाईफ सायकल कमी होतं. लोकल किंवा खराब बॅटरी इन्व्हर्टरची कार्यक्षमताही कमी करू शकते. एवढंच नाही, तर लोकल मेड बॅटरी कार्बन मोनोऑक्साईड सारखे विषारी गॅसही सोडतात. असे विषारी गॅस घर आणि पर्यावरणासाठीही हानिकारक ठरतात. त्यामुळे नेहमी चांगल्या ब्रँडची बॅटरी खरेदी करणं फायद्याचं ठरतं.
जर तुम्ही लोकल बॅटरी खरेदी केली असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लोकल बॅटरी असेल, तर काही ट्रिक वापरुन इन्व्हर्टरची कार्यक्षमता, बॅटरी अधिक काळ चालण्यास मदत होईल.
- बॅटरी अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश येणार नाही. सर्वसाधारणपणे इन्व्हर्टर ट्रॉलीसह येतात, जे बॅटरीला आवश्यक सुविधा प्रदान करतात.
- बॅटरी नेहमी सुक्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवावी. फ्लॅट प्लेट आणि ट्यूबलर बॅटरीला अधिक वेटिंलेशनची गरज असते. कारण अशा बॅटरी कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड सोडतात.
- बॅटरी टर्मिनल लहान मुलांपासून दूर ठेवा.
- बॅटरी ग्राउंड लेवलवर ठेवणं फायद्याचं ठरतं. यामुळे वेळोवेळी फ्लोट इंडिकेटर्सवर लक्ष देणं फायद्याचं ठरतं. जर तुमच्याकडे SMF बॅटरी असेल, तर ती उंचावर ठेऊ शकता.
- बॅटरीमध्ये अॅसिडऐवजी डिस्टिल्ड वॉटर टाकणं गरजेचं आहे. हे बॅटरीची दुकानं आणि पेट्रोल पंपावरही उपलब्ध असतं.
- बॅटरी टर्मिनल गंजापासून दूर ठेवण्यासाठी ते गरम पाणी आणि बेकिंग सोड्याच्या मिश्रणाने साफ करणं फायद्याचं ठरतं. टर्मिनल साफ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचाही वापर करू शकता. एकदा साफ केल्यानंतर टर्मिनलवर, नटबोल्टवर पेट्रोलियम जेली-वॅसलिन लावणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.