नवी दिल्ली, 17 जून : इन्स्टाग्रामवर (Instagram) अनेकांची आपले फॉलोवर्स वाढत नसल्याची तक्रार असते. ज्यावेळी ते एखादी पोस्ट करतात, त्यावेळी पोस्टची रीचदेखील वाढत नाही. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्यास, ही समस्या सोडवली जाऊ शकते. काही ट्रिक्स वापरुन इन्स्टाग्रामवर तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोहचू शकता.
कोणताही फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यापूर्वी त्यासंबंधित हॅशटॅगबाबत सर्च करा. जर पोस्टमध्ये योग्य हॅशटॅग वापरला तर, अधिक लोक पोस्ट पाहू शकतात. यामुळे फॉलोवर्स (Followers) वाढण्याचीही शक्यता असते. ज्यावेळी एखाद्या ट्रेंडिंग हॅशटॅगसह (Trending Hashtags) पोस्ट कराल त्यावेळी लोक पोस्ट पाहण्यासाठी येऊ शकतात.
युजरने पोस्ट अपलोड केल्यानंतर आपलं लोकेशनही टॅग करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमच्या पोस्टसंबंधित प्रसिद्ध लोकांनाही तुमची पोस्ट टॅग करू शकता. यामुळे पोस्ट रीच वाढेल. जर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने किंवा इन्फ्लुएन्सरने तुमची पोस्ट लाईक किंवा शेअर केली, तर पोस्ट व्हायरल होऊ शकते. यामुळेही फॉलोवर्सची संख्या वाढण्यास मदत होईल.
सोशल मीडियाचा (Social Media) वापर करताना, कोणत्या वेळेत अधिक लोक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात ते पाहावं. त्यामुळे अधिकाधिक कोणत्या वेळेत लोक जास्त अॅक्टिव्ह असतात, या अंदाजाने पोस्ट अपलोड करावी. यामुळे पोस्ट रीच वाढवण्यास मदत मिळेल.
जर कंटेट क्रिएटर असाल, तर एखादा कंटेंट चांगला (Quality Content) असल्यासही फॉलोवर्स वाढण्यास मदत होईल. जर तुम्ही तुमची पोस्ट ट्रेंडिंगमध्ये आणू इच्छित असाल, तर चालू मुद्द्यासंबंधित (Current Topic) पोस्ट करा.
तसंच Audienece लक्षात घेऊन, पोस्ट अधिक चांगल्या प्रकारे सादर करा. यामुळे फॉलोवर्स वाढण्यास मदत होईल. त्याशिवाय इन्स्टाग्रामवर अधिक अॅक्टिव्ह राहा आणि पोस्ट करत राहा. Podcasts किंवा Live Streaming करुनही युजर्स त्यांचा सर्कल वाढवू शकतात.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.