• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • WhatsApp प्रोफाइल फोटो आता करता येणार हाइड, अशी आहे प्रक्रिया

WhatsApp प्रोफाइल फोटो आता करता येणार हाइड, अशी आहे प्रक्रिया

मोबाइल आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मोबाइल नंबरच्या सहाय्याने अनेक व्यवहार केले जातात. अगदी ऑफिसपासून विविध ई-कॉमर्स (E-Comerce) कंपन्यांपर्यंत सर्वत्र आपला मोबाइल नंबर शेअर झालेला असतो. त्यामुळे आपल्या व्हॉट्सअॅपवरील आपला प्रोफाइल फोटो एखादी अनोळखी व्यक्तीही पाहू शकते.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : मोबाइल आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मोबाइल नंबरच्या सहाय्याने अनेक व्यवहार केले जातात. अगदी ऑफिसपासून विविध ई-कॉमर्स (E-Comerce) कंपन्यांपर्यंत सर्वत्र आपला मोबाइल नंबर शेअर झालेला असतो. त्यामुळे आपल्या व्हॉट्सअॅपवरील आपला प्रोफाइल फोटो एखादी अनोळखी व्यक्तीही पाहू शकते. तसंच ते स्क्रीन शॉटही घेऊ शकतात. मात्र हे आपण टाळू शकतो. आपण आपला प्रोफाइल फोटो हाइड करू शकतो. केवळ काही निवडक लोकच आपला प्रोफाइल फोटो पाहू शकतील. प्रोफाइल फोटो हाइड(Profile Photo Hide)करण्यासाठी ही प्रक्रिया करावी लागेल. व्हॉट्सअॅप प्रोफाइलफोटो हाइड करण्यासाठी : -सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा आणि व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये जा. -तिथं अकाउंटवर क्लिक करून मग प्रायाव्हसी बटणावर क्लिक करा. -यानंतर, प्रोफाइल फोटोवर टॅप करा. -व्हॉट्सअ‍ॅपच्या डीफॉल्ट सेटिंगमध्ये, आपल्या प्रोफाइल फोटोमध्ये Everyone असा ऑप्शन दिसेल. म्हणजेच कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला आपला प्रोफाईल फोटो दिसेल. -परंतु प्रत्येकानं आपला प्रोफाइल फोटो बघू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर, तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जला माय कॉन्टॅक्टमध्ये बदलावं लागेल. यानंतर,तेच लोक आपला प्रोफाइल फोटो बघू शकतील, ज्यांचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्हआहे. -कोणीही आपला प्रोफाइल फोटो (Profile Photo) पाहावा असं तुम्हाला वाटत असल्यास, आपल्याला सेटिंग्ज मध्ये No One पर्याय निवडावा लागेल. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरील प्रत्येकासाठी तुमचा फोटो हाइड होईल. -एकदा तुमचा प्रोफाइल फोटो हाइड झाल्यानंतर, जे लोक तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप करतात त्यांना तुमच्या डीपीमध्ये फक्त ग्रे कलरचा फोटो दिसेल. -व्हॉट्सअ‍ॅपनं विशिष्ट लोकांसाठी ही प्रोफाइल हाइड करण्याची सुविधा दिलेली नाही. फोनमध्ये अनसेव्ह(Unsave)असणाऱ्या लोकांसाठीच तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल फोटो हाइड करू शकता. या सुविधेमुळे प्रोफाइल फोटोचा स्क्रीन शॉट काढणं, त्याचा गैरवापर करणं, याची शक्यता उरत नाही. आजकाल व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपण असंख्य ओळखीच्या आणि अनोळखी लोकांशीही जोडले जातो. आपला मोबाइल नंबर ई-कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीपासून अनेक अनोळखी लोकांकडे असतो. तसंच आर्थिक देवाण-घेवाणीसाठीही आपण मोबाइल वापरतो. त्यामुळं गोपनीय माहिती मिळवून फसवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे. फोटोंचा गैरवापरही केला जातो. हे सगळं टाळण्यासाठी काही सुविधा वेगवेगळी अ‍ॅप्स देत असतात. तशीच ही अनोखी सुविधा व्हॉट्सअ‍ॅपनं दिली आहे. त्यामुळं आपण आपली प्रायव्हसी जपू शकतो.
  First published: