नवी दिल्ली, 3 जून : प्रत्येकाचा स्मार्टफोन पर्सनल आणि प्रोफेशनल डेटाने भरलेला असतो. फोनमध्ये असे अनेक फोटो, व्हिडीओ असतात जे आपण कोणाशीही शेअर करू इच्छित नाही. काही वेळा आपला फोन दुसऱ्या हातात जातो आणि आपले पर्सनल फोटो-व्हिडीओ तो व्यक्ती पाहण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे यावर सर्वात चांगला पर्याय म्हणजे, जे फोटो-व्हिडीओ तुम्हाला प्रायव्हेट ठेवायचे आहेत, ते लपवले जावेत. एका ट्रिकद्वारे स्मार्टफोन गॅलरीमधून फोटो-व्हिडीओ Hide करता येऊ शकतात.
कसे Hide कराल फोटो-व्हिडीओ -
अनेक लोक Google Photos App चा वापर करतात. हे अॅप अँड्रॉईड आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे. गुगल फोटोज अॅपमध्ये फोटो-व्हिडीओ लपवण्याचा ऑप्शनही मिळतो. Google Photos ओपन करुन, असे फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट करा, जे हाईड करायचे आहेत. त्यानंतर थ्री डॉट मेन्यूवर टॅप करा. इथे Move to Archive असा पर्याय मिळेल. त्यानंतर हाईड करायचे सर्व फोटो-व्हिडीओ Archive Folder मध्ये जातील.
Samsung फोनमध्ये असे हाईड करा फोटो -
जर तुम्ही सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये गॅलरी अॅपचा वापर करत असाल, तर इथेदेखील तुम्ही पर्सनल फोटो हाईड करू शकता. त्यासाठी एक नवा Album बनवा आणि त्याला एखादं नाव द्या. त्या अल्बममध्ये तुमचे फोटो-व्हिडीओ मूव्ह करा. आता खाली असलेल्या Albums ऑप्शनमध्ये जा आणि थ्री डॉट मेन्यूवर टॅप करा. त्यानंतर Hide/Unhide Albums पर्याय निवडा.
Oneplus फोनमध्ये असे हाईड करा फोटो -
वनप्लस स्मार्टफोनमध्ये गॅलरी अॅप ओपन करा. हाईड करायचे असणारे फोटो-व्हिडीओ सिलेक्ट करा. थ्री डॉट मेन्यूवर टॅप करा. इथे Hide चा पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा. अशारितीने तुमचे फोटो गॅलरीमध्ये दिसणं बंद होईल.
Xiaomi -
शाओमी स्मार्टफोनचाही भारतात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फोनमध्ये गॅलरी अॅप ओपन करा आणि हाईड करायचे फोटो-व्हिडीओ सिलेक्ट करा. मेन्यूमध्ये दिलेल्या Hide बटणावर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo gallery, Smartphone, Tech news