मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

पैसे न भरताच वर्षभर फ्रीमध्ये पाहता येईल Netflix, पण करावं लागेल हे एक काम

पैसे न भरताच वर्षभर फ्रीमध्ये पाहता येईल Netflix, पण करावं लागेल हे एक काम

ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी त्याचं सब्सक्रिप्शन घेणं आलं, म्हणजेच एखाद्या प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज, चित्रपट पाहण्यासाठी पैसे भरावे लागणार. पण काही वेळा ओटीटी प्लॅटफॉर्म पैसे न भरताच पाहता येऊ शकतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 23 जुलै : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउन करण्यात आलं आणि सर्वांनाच यामुळे घरात बसावं लागलं. अशात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. थिएटर्स, नाट्यगृह बंद असल्याने मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) अनेक चित्रपट, वेबसीरिज रिलीज होत होत्या. अनेक युजर्सकडून मोठ्या प्रमाणात या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर वाढला. पण ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी त्याचं सब्सक्रिप्शन घेणं आलं, म्हणजेच एखाद्या प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज, चित्रपट पाहण्यासाठी पैसे भरावे लागणार. पण काही वेळा ओटीटी प्लॅटफॉर्म पैसे न भरताच पाहता येऊ शकतो. एका ट्रिकने तुम्ही फ्रीमध्ये नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन (Netflix Subscription) मिळवू शकता.

नेटफ्लिक्सचा सुरुवातीचा प्लॅन 199 रुपयांपासून सुरू होतो. इतर प्लॅनची किंमत 499, 649 आणि 799 रुपये आहे. पण पैसे न भरताच नेटफ्लिक्स पाहता येऊ शकतं. Reliance Jio सारखे अनेक ऑपरेटर्स, काही ब्रॉडबँड योजना देतात ज्याद्वारे युजर्स फ्रीमध्ये सब्सक्रिप्शन मिळवू शकतात.

Netflix सब्सक्रायबर्ससाठी Good News! आता गेमिंग अ‍ॅप मिळणार मोफत

JioFiber -

1499 रुपयांच्या जिओ फायबर प्लॅनमध्ये फ्रीमध्ये नेटफ्लिक्स मिळतं. शिवाय 300mbps स्पीड मिळतो, अनलिमिटेड डेटा मिळतो. हा प्लॅन 30 दिवसांपर्यंत वैध असतो.

तसंच 2499 रुपयांच्या JioFiber प्लॅनमध्येही फ्री नेटफ्लिक्स मिळतं. यात 30 दिवसांसाठी 500mbps स्पीड, अनलिमिटेड डेटा मिळतो.

पैसे न भरता मोफत पाहा Netflix; जाणून घ्या कसं मिळवाल फ्री सब्सक्रिप्शन

जर तुम्ही JioFiber ग्राहक झालात, तर पहिल्या महिन्यासाठी संपूर्ण सुविधा फ्री मिळते. त्यानंतर प्लॅनसाठी पैसे भरावे लागतात. जर तुम्ही 12 जणांचा रेफरन्स दिला, आणि त्यांनीही जिओ फायबर लावून घेतलं, तर तुम्हाला 12 महिने अर्थात वर्षभर फ्रीमध्ये सुविधा मिळेल. त्यात नेटफ्लिकसही पूर्णपणे फ्रीमध्ये पाहता येईल.

First published:

Tags: Netflix, OTT, Reliance Jio, Tech news