Home /News /technology /

Instagram चं नवं फीचर; आता रील्स किंवा पोस्ट चुकून डिलीट झाल्यास करता येणार रिकव्हर; पाहा सोप्या स्टेप्स

Instagram चं नवं फीचर; आता रील्स किंवा पोस्ट चुकून डिलीट झाल्यास करता येणार रिकव्हर; पाहा सोप्या स्टेप्स

जर इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट, स्टोरी, रिल्स किंवा IGTV चुकून डिलीट झालं असेल, तर ते आता रिकव्हर करता येणार आहे.

  नवी दिल्ली, 22 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने (Instagram) अनेक नवे फीचर्स अ‍ॅड केले गेले आहेत. त्यात Recently Deleted फीचरही अ‍ॅड करण्यात आला आहे. या नव्या फीचरमुळे इन्स्टाग्रामवर डिलीट झालेल्या पोस्ट किंवा रिल्स काही स्टेप्सनी रिकव्हर केल्या जाऊ शकतात. जर इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट, स्टोरी, रिल्स किंवा IGTV चुकून डिलीट झालं असेल, तर ते आता रिकव्हर करता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, Instagram वर डिलीट झालेल्या पोस्ट केवळ 30 दिवसांतच रिस्टोर केल्या जाऊ शकतात. - रिस्टोर करण्यासाठी सर्वात आधी Instagram ओपन करा. - त्यानंतर प्रोफाईल पेजवर जा. येथे वर उजव्या बाजूला असलेल्या हेमबर्गर मेन्यूवर क्लिक करुन सेटिंग ओपन करा. - त्यानंतर अकाउंट सेटिंगमध्ये जावं लागेल. - अकाउंट सेटिंगमध्ये Recently Deleted मेन्यू ओपन करा.

  (वाचा - WhatsApp वर या Scam पासून राहा सावधान; Account हॅक झाल्यास काय कराल?)

  - या मेन्यूमध्ये सर्व डिलीट केलेल्या गोष्टी मिळतील. यात फोटो, व्हीडीओ, स्टोरी, रिल्स आणि IGTV सामिल असेल. - जे रिल किंवा जो फोटो रिकव्हर करायचा आहे, तो ओपन करा. - पोस्ट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला वर तीन डॉट मेन्यूवर क्लिक करा. त्यानंतर Restore वर क्लिक करा. त्यानंतर कन्फर्म करा. - यानंतर एक ऑथेंटिकेशन पेज येईल.

  (वाचा - तुमचं Account, Password सुरक्षित कसं ठेवाल? Google ने सांगितल्या खास टिप्स)

  - इथे युजरला आपला मोबाईल नंबर किंवा ईमेलवर आलेला ओटीपी देऊन कन्फर्म करावं लागेल. त्यानंतर डिलीटेड पोस्ट इन्स्टाग्राम प्रोफाईलवर दिसतील. डिलीट झालेल्या पोस्ट रिस्टोर करण्यासाठी केवळ 30 दिवसांचा कालावधीच वॅलिड आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Instagram, Instagram post, Tech news

  पुढील बातम्या