Home /News /technology /

आता तुम्हालाही इन्स्टाग्राम देईल ब्लू टिक! फक्त `या` सोप्या टिप्सचा करा वापर

आता तुम्हालाही इन्स्टाग्राम देईल ब्लू टिक! फक्त `या` सोप्या टिप्सचा करा वापर

इन्स्टाग्रामवर व्हेरिफाय करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. जर तुम्हाला तुमचे खाते सत्यापित करायचे असेल तर तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी युजर्सना रिक्वेस्ट पाठवायची आहे.

    मुंबई, 13 मे : मोडकळीस आलेल्या सामाजिक रचनेमुळे एकाकी पडलेल्या लोकांना आभासी जग (Virtual World) हा एकमेव आधार वाटतो. या जगात ते त्यांच्या मनातलं बोलू शकतात आणि इतरांचं ऐकू शकतात. या जगातही आपण वेगळे आहोत हे अन्य युजर्सना दिसावं यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतात. याबाबत आपल्याला ब्लू टिकचं (Blue Tick) उदाहरण बघता येईल. ट्विटर, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर ब्लू टिक असलेली विशेष युजर्सची अकाउंट्स आणि हँडल्स आपण पाहतो. जर तुम्ही इन्स्टाग्रामवर (Instagram) असाल आणि इन्स्टा अकाउंटवर ब्लू टिक दिसावी, असं वाटत असेल तर तुम्हाला तुमचं अकाउंट व्हेरिफाय (Account Verify) करावं लागेल. अकाउंट व्हेरिफाय झाल्यावर कंपनीकडून ही ब्लू टिक दिली जाते. अन्य युजर्स व्हेरिफाईड अकाउंटला जास्त महत्त्व देतात. या ब्लू टिकचे अनेक फायदे आहेत. ब्लू टिक मिळाल्यानंतर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तुम्ही उत्पन्न (Earning) वाढवू शकता. तसंच तुम्ही कंपन्यांसोबत भागीदारी करूनही पैसे कमवू शकता. यासाठी करावं लागेल `हे` काम अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी रिक्वेस्टसह काही कागदपत्रांची (Documents) गरज असते. यात तुम्हाला काही वैयक्तिक माहिती (Personal Information) शेअर करावी लागते. इन्स्टाग्राम या सर्व कागदपत्रांचा आणि माहितीचा अभ्यास करते. अभ्यासादरम्यान, जर तुमचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी योग्य असेल, असं इन्स्टाग्रामला वाटलं तर ते अकाउंट व्हेरिफाय करून त्यावर ब्लू टिक लावतात. उन्हात बाईक चालवणं होणार सुसह्य, हेल्मेटला ‘कूल’ करणाऱ्या गॅझेटची बाजारात एंट्री ब्लू टिक मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्स्टाग्राम अकाउंट सुरू करावं लागेल. अकाउंट सुरू केल्यानंतर डावीकडे खालील बाजूला प्रोफाईल पिक्चर वर (Profile Picture) असलेल्या आयकॉनवर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो दिसेल. त्यानंतर फोटोच्या उजवीकडे असलेल्या तीन ठिपके (...) या आयकॉनवर क्लिक करावं. येथील सेटिंग ऑप्शनवर क्लिक करावं. सेटिंगनंतर अकाउंटवर क्लिक करावे आणि त्यानंतर रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनवर क्लिक करावे. स्क्रिनवर देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून माहिती अपलोड करत जावी. अशा प्रकारे तुम्ही अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी रिक्वेस्ट करू शकता. तुमच्या अर्जानुसार इन्स्टाग्राम तुमच्या अकाउंटची तपासणी करेल. तुमच्या अकाउंटची इन्स्टाच्या सर्व निकषांनुसार चाचणी केली जाईल. सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला ब्लू टिक मिळू शकेल. या गोष्टी ठेवा लक्षात ब्लू टिकसाठी अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही सर्व निकष पूर्ण केले असले तरी तुमचं अकाउंट व्हेरिफाय केले जाईल याची कोणतीही हमी नाही. इन्स्टा कोणत्याही कारणामुळे तुमचा अर्ज रद्द करू शकतो. एकदा अकाउंट व्हेरिफाय झाल्यावर तुम्ही तुमच्या नावात बदल करू शकत नाही, या गोष्टी लक्षात ठेवा.
    First published:

    Tags: Instagram

    पुढील बातम्या