नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी Aadhaar Card महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारी कामांसह खासगी कामांसाठीही आधार कार्डची गरज असते. मोठ्यांसह अगदी नवजात बाळाचंही आधार कार्ड बनवता येतं. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, 5 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी Blue Aadhaar किंवा Baal Aadhaar Card मिळतं. मुलाच्या 5 वर्षांनंतर हे बाल आधार अमान्य ठरतं. त्यानंतर ते पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी बायोमेट्रिकची गरज असते.
5 वर्षाहून कमी वय असलेल्या लहान मुलांच्या आधार कार्डसाठी अर्ज करता येतो. जवळच्या आधार केंद्रात जावून फॉर्म भरावा लागतो. मुलांसाठी आधार कार्ड फ्रीमध्ये दिलं जातं. 5 वर्षाहून कमी वयोगटातील मुलांचा कोणताही बायोमेट्रिक डेटा कॅप्चर केला जात नाही. यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.
Blue Aadhaar Card साठी आवश्यक कागदपत्र -
5 वर्षाहून लहान मुलांच्या आधारसाठी अर्ज करताना मुलाच्या जन्माचं प्रमाणपत्र किंवा मुलाच्या शाळेतील फोटो ID आवश्यक असतो. त्याशिवाय आई-वडिलांच्या आधार कार्डचे डिटेल्सही असणं गरजेचं आहे.
असा करा ऑफलाइन अर्ज -
- सर्वात आधी जवळच्या आधार केंद्रावर जावं लागेल.
- त्यानंतर अर्ज भरावा लागेल.
- पालकांना आपलं कार्ड आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल.
- बायोमेट्रिकची आवश्यकता नसल्याने मुलाचा केवळ फोटो काढला जाईल.
- सर्व डॉक्युमेंट्सचं वेरिफिकेशन होईल. वेरिफिकेशननंतर आई-वडिलांद्वारा दिलेल्या फोन नंबरवर एक मेसेज येईल.
- त्यानंतर 60 दिवसांच्या आत मुलाचं आधार कार्ड मिळेल.
ऑनलाइन असा करा अर्ज -
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जा.
- त्यानंतर Aadhaar Card रजिस्ट्रेशन पर्यायावर जा.
- आता मुलाचं नाव, पालकांचा मोबाइल नंबर आणि पालकांचा ईमेल आयडी टाकावा लागेल.
- त्यानंतर Fix Appointment बटणावर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, M aadhar card