• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • काही मिनिटांत समजेल फोनचं लोकेशन; जाणून घ्या कसा मिळवाल हरवलेला स्मार्टफोन

काही मिनिटांत समजेल फोनचं लोकेशन; जाणून घ्या कसा मिळवाल हरवलेला स्मार्टफोन

अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्सचं लॉगइनही अनेकांच्या फोनमध्ये सेव्ह असतं. त्यामुळे अशात स्मार्टफोन हरवणं ही मोठी चिंतेची बाब ठरु शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 मार्च : सध्याच्या काळात स्मार्टफोन प्रत्येकासाठीच महत्त्वाची गोष्ट आहे. आयफोन किंवा इतर कोणताही स्मार्टफोन हरवणं ही सगळ्यांसाठीच दु:खाची बाब ठरते. सध्या स्मार्टफोन म्हणजे केवळ फोटो, व्हिडीओ, गाणी ठेवण्यासाठीचं माध्यम नसून अनेक महत्त्वाची खासगी माहितीही स्मार्टफोनमध्ये स्टोर केलेली असते. अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्सचं लॉगइनही अनेकांच्या फोनमध्ये सेव्ह असतं. त्यामुळे अशात स्मार्टफोन हरवणं ही मोठी चिंतेची बाब ठरु शकते. कसा ट्रॅक कराल हरवलेला iPhone? - यासाठई फाइंड माय आयफोनचा वापर करता येतो. - त्याशिवाय हरवलेल्या iPhone ला Apple च्या फॅमिली शेअरिंगच्या माध्यमातूनही ट्रॅक करता येऊ शकतं. - फोन शोधण्यासाठी गुगल टाईमलाईन, गुगल फोटोचाही वापर करता येतो. फाइंड माय आयफोनचा वापर कसा कराल? - फोनमध्ये फाइंड माय आयफोन इनबिल्ट असल्यास, मोबाईल फोनला लोकेट करा. - आपल्या iPhone चा डेटा सुरक्षित ठेवा, त्यासाठी लॉस्ट मोड किंवा इरेजिंग डेटा रिमोटलीचा वापर करा.

  (वाचा - नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासणं आवश्यक; सरकारकडून महत्त्वाची माहिती)

  कसा शोधाल iPhone? - यासाठी कंप्युटरवर icloud.com वर क्लिक करा. त्यानंतर साईन-इन करावं लागेल. - त्यानंतर फाइंड माय आयफोनवर लिंकवर क्लिक करा. - यानंतर फाइंड माय आयफोन मॅपच्या इंटरफेसमध्ये याल, येथे ड्राप डाउन मेन्यूमध्ये जावून आपल्या लॉस्ट iPhone वर क्लिक करा. त्यानंतर फोनच्या लोकेशनची माहिती मिळेल.

  (वाचा - WhatsApp Chat सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंग्जमध्ये करा 'हे' बदल)

  कसा डिलिट कराला iPhone चा डेटा? - यासाठी इरेस आयफोनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आयफोन डेटा रिमोटली डिलिट करू शकता. परंतु डेटा डिलिट करण्यापूर्वी महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ, गाणी आणि इतर महत्त्वाचा डेटा कॉपी करुन घ्या, जेणेकरुन एकदा डिलिट झालेला डेटा पुन्हा मिळू शकेल.
  Published by:Karishma Bhurke
  First published: