Home /News /technology /

Covid-19 वॅक्सिनेशन सेंटर शोधण्यास समस्या येतेय? फॉलो करा या स्टेप्स

Covid-19 वॅक्सिनेशन सेंटर शोधण्यास समस्या येतेय? फॉलो करा या स्टेप्स

लसीकरणानंतर दुष्परिणाम झालेल्यांना सरकारी मदत

लसीकरणानंतर दुष्परिणाम झालेल्यांना सरकारी मदत

भारतात Covaxin आणि Covishield अशा दोन लशींना मंजुरी देण्यात आली आहे. अनेक लोकांना आपल्या जवळच्या वॅक्सिनेशन सेंटरची माहिती मिळवण्यासाठी अनेक समस्या येत आहेत. परंतु ही प्रोसेस अतिशय सोपी आहे.

  नवी दिल्ली, 10 एप्रिल : भारतात कोरोना रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना वॅक्सिनेशन अधिकच महत्त्वपूर्ण ठरत आहे. सध्या सरकार वॅक्सिनेशनच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यात 45 वर्षाहून अधिक वयोगटातील नागरिकांचं वॅक्सिनेशन केलं जात आहे. खाजगी रुग्णालयात कोविड लशीची किंमत 250 रुपये आहे. तर सरकारी रुग्णालयात लस मोफत दिली जात आहे. भारतात Covaxin आणि Covishield अशा दोन लशींना मंजुरी देण्यात आली आहे. अनेक लोकांना आपल्या जवळच्या वॅक्सिनेशन सेंटरची माहिती मिळवण्यासाठी अनेक समस्या येत आहेत. परंतु ही प्रोसेस अतिशय सोपी आहे. कसं शोधाल Covid-19 वॅक्सिनेशन सेंटर - - कोरोना वॅक्सिनेशन केंद्र शोधण्यासाठी युजर्सला Cowin पोर्टल किंवा MapMyIndia वेबसाईटवर जावं लागेल. - सर्वात आधी cowin.gov.in वर जा. त्यानंतर होम पेजच्या खालच्या बाजूला स्क्रोल करा. येथे Find Your Nearest Vaccination Center हा पर्याय दिसेल. - या पर्यायाखाली भारताचा मॅप दिसेल. येथे + किंवा - यावर सिलेक्ट करुन तुमचं क्षेत्र निवडा. येथे क्षेत्र सिलेक्ट केल्यानंतर वॅक्सिनेशन सेंटर कुठे आहे, याबाबत समजेल. - तसंच करंट लोकेशनवर टॅप करुन आपलं क्षेत्र निवडावं लागेल आणि Go वर टॅप करावं लागेल. - तसंच पीन कोड टाकूनही वॅक्सिनेशन सेंटरचा पत्ता मिळवू शकता. - येथे लिस्टमध्ये रुग्णालयं आणि वॅक्सिनेशन सेंटरची माहिती मिळेल. येथे संपूर्ण पत्ता मिळेल आणि Get Direction बटणावर टॅप करुन कसं पोहचता येईल, हेदेखील समजेल.

  (वाचा - Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; बुक करा स्लॉट)

  MapMyIndia पोर्टलवर असं शोधा वॅक्सिनेशन सेंटर - - यासाठी MapMyIndia वेब पोर्टल किंवा App ही डाउनलोड करू शकता. - साईटचे सर्व फीचर्स अॅक्सेस करण्यासाठी रजिस्टर करावं लागेल. एकदा लॉगइन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये करंट लोकेशन टाकून, पत्ता टाकावा लागेल. - त्यानंतर Vaccination Centres पर्यायावर टॅप करा. - येथे जवळच्या वॅक्सिनेशन सेंटरची माहिती मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Corona vaccination, Coronavirus

  पुढील बातम्या