Home /News /technology /

सहजपणे मिळू शकतो हरवलेल्या Android फोनचा डेटा, करावं लागेल हे सोपं काम

सहजपणे मिळू शकतो हरवलेल्या Android फोनचा डेटा, करावं लागेल हे सोपं काम

फोन हरवल्यास, फोनमध्ये असणारा डेटा धोक्यात येऊ शकतो. पण फोन चोरी झाला तर त्या फोनचा डेटा सहजपणे पुन्हा मिळवता येऊ शकतो.

  नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : स्मार्टफोन (Smartphone) सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाचा भाग झाला आहे. फोन हरवला तर अनेकांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ दोन्हीमध्ये अडथळे येऊ शकतात. फोनमध्ये असणारा डेटा धोक्यात येऊ शकतो.  पण फोन चोरी झाला तर त्या फोनचा डेटा सहजपणे पुन्हा मिळवता येऊ शकतो. फाइंड माय डिव्हाईस - सॅमसंग फोनमध्ये फाइंड माय डिव्हाईस किंवा फाइंड माय मोबाईल नावाचं इन-बिल्ट फीचर असतं. फोन चोरी झाल्यास, तुमचा स्मार्टफोन ट्रॅक करणं, रिंग करणं, लॉक करणं किंवा इरेज करणं अशा गोष्टी या फीचरच्या मदतीने केल्या जाऊ शकतात. हे फीचर युजरला सेटिंग टॅबमध्ये मिळतं. केवळ टॉगल करुन या फीचरचा वापर केला जावू शकतो. ब्लूटूथ ट्रॅकर, स्मार्ट स्पीकर - ब्लूटूथ ट्रॅकर तुमचा फोन हरवल्यानंतर तो ट्रॅक करण्याचा आणखी एक पर्याय आहे. परंतु हे एका मर्यादित वेळेतच काम करतं. एकदा ब्लूटूथ ट्रॅकर खरेदी केल्यानंतर ते फोनशी कनेक्ट करावं लागतं. ट्रॅकरद्वारे फोनवर अलार्म सक्रिय होईल. जवळपासच फोन हरवला असल्यास स्मार्ट स्पीकरचा वापर करता येऊ शकतो. यासाठी तुमचा फोन आणि स्पीकर एकाच अकाउंटमध्ये साइन-इन असणं गरजेचं आहे.

  या चुकांमुळे स्मार्टफोनमध्ये लागू शकते आग, अशी घ्या काळजी

  लॉक स्क्रिन मेसेज - फोन चोरी झाल्यास, लॉक स्क्रिन मेसेज सेट करता येतो. पासवर्डशिवाय कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकत नाही. त्यामुळे लोकांना हे सांगण्यासाठी मेसेज सेट करू शकता, की तुम्ही डिव्हाईसचा शोध घेत आहात. अकाउंट सुरक्षा - फोनमध्ये अनेक सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अकाउंट्स लॉग-इन असतात. त्यामुळे डेटा सुरक्षेसाठी हे अकाउंट लॉग-आउट करणं गरजेचं आहे. फाइंड माय डिव्हाईसचा वापर करुन हा पर्याय निवडता येतो. परंतु असं केल्यानंतर फोन ट्रॅक करता येणार नाही.

  Mobile Charging रात्रभर सुरू ठेवलं तर काय होतं? कधी किती वेळ चार्ज करावा मोबाईल?

  चोरी रिपोर्ट - भारतात कोणताही फोन चोरी झाल्यानंतर त्याबाबत रिपोर्ट करणं FIR (First Information Report) दाखल करणं गरजेचं असतं. ऑनलाईन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून तक्रार करता येते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Smartphone

  पुढील बातम्या