Home /News /technology /

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर जाणून घ्या डेटा कसा इरेज कराल?

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर जाणून घ्या डेटा कसा इरेज कराल?

कधी फोन हरवला तर तो ट्रॅक करता येईल, त्यातील वैयक्तिक आणि महत्त्वाची माहिती दूरूनच डिलिट करता येणार आहे.

  मुंबई, 29 ऑक्टोबर : मोबाइल फोन हरवला किंवा चोरीला गेला तर मोठं दु:ख होतं. एक तर मोबाइल फोन हरवल्याचं दु:ख आणि दुसरं म्हणजे फोन हरवल्यावर त्यात सेव्ह केलेला महत्त्वाचा डेटाही गेल्याचं दु:ख होतं. पण कधी फोन हरवला तर तो ट्रॅक करता येईल, त्यातील वैयक्तिक आणि महत्त्वाची माहिती दूरूनच डिलिट करता येणार आहे. अँड्रॉइड फोन असेल तर - - दुसऱ्या कुठल्याही अँड्रॉईड फोनवर जाऊन गूगल प्ले स्टोअरमधून (Google play store) अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर ऍप डाउनलोड (Android Device Manager app) करा. - अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर अप वापरून चोरीला गेलेला अँड्रॉइड फोन शोधता येईल आणि दूरूनच त्या फोनमध्ये असलेला डेटा डिलिटही करता येतो किंवा तो फोन लॉकही करता येतो. म्हणजे तो इतरांना वापरता येणार नाही. - android.com/find या वेबसाइटवर जाऊन Google Account ला लॉगइन करा. - जर हरवलेल्या फोनवर अनेक युजर प्रोफाइल असतील तर त्यातील मुख्य प्रोफाइलच्या गूगल अकाउंटमध्ये साइन इन करा. त्या हरवलेल्या फोनवर एक नोटिफिकेशन जाईल. गुगल मॅप्सवर फोन कुठे आहे ते दिसेल. हे लोकेशन कदाचित अंदाजे असू शकेल ते अचूकच असेल असं सांगता येणार नाही. - जरी फोन कुठे आहे हे सापडलं नाही, तरीही जर उपलब्ध असेल तर तुमच्या फोनचं लास्ट लोकेशन म्हणजे हरवण्यापूर्वी तो कुठे होता हे दिसेल. ज्याचा फोन शोधायला उपयोग होऊ शकतो. - गरज असेल तर एनेबल लॉक करा आणि इरेज करा. (वाचा - Cyber Fraud: बँक खात्यावर चोरट्यांचा डल्ला; टेन्शन घेऊ नका, असे परत मिळतील पैसे) - प्ले साउंड : फोन सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर असेल तरीही प्ले साउंड दाबल्यावर फोनची रिंग 5 मिनिटं मोठ्या आवाजात वाजत राहील. - सिक्युअर डिव्हाइस : हे दाबल्यानंतर फोन लॉक होईल आणि केवळ फीड केलेल्या पिन नंबर, पॅटर्न किंवा पासवर्डनेच तो उघडता येईल. जर फोनमध्ये लॉक सेट केलं नसेल तर ते सेट करा. - फोन ज्याच्या हातात पडेल त्याला तो तुम्हाला परत देता यावा, यासाठी तुमच्या लॉक स्क्रीनवर एक मेसेज लिहून ठेवू शकता, ज्यात तुमचा फोन नंबर किंवा संपर्काची माहिती असेल.

  (वाचा - भारतापेक्षा पाकिस्तानचा 'स्पीड' जास्त; नेपाळ आपल्या पुढे, 'या' शर्यतीत देश मागे)

  - इरेज डिव्हाइस : हा पर्याय वापरून, फोनमध्ये साठवलेला सगळा डेटा कायमचा डिलिट होईल. (पण एसडी कार्डावरचा डेटा डिलिट होणार नाही) डेटा इरेज केल्यावर फाइंड माय डिव्हाइस त्या फोनवर काम करू शकणार नाही. डेटा इरेज केल्यावर जर फोन सापडला तरीही तुम्हाला तो पुन्हा वापरण्यासाठी गुगल अकाउंटचा पासवर्ड माहिती असणं गरजेचं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Smartphone

  पुढील बातम्या