Whatsapp स्टेटसचे फोटो, Video डाउनलोड करण्यासाठी वापरा ही ट्रिक, कोणत्याच App ची गरज नाही

Whatsapp स्टेटसचे फोटो, Video डाउनलोड करण्यासाठी वापरा ही ट्रिक, कोणत्याच App ची गरज नाही

तुमच्या मित्रांनी स्टेटसला ठेवलेले फोटो, व्हिडिओ आवडतात तेव्हा ते मला सेंड कर असं म्हणून घ्यावे लागतात. मात्र आता कोणत्याही अॅपशिवाय स्टेटसचे फोटो व्हिडिओ घेता येतात.

  • Share this:

मुंबई - मेसेजिंग अॅप व्हॉटसअॅपने त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स दिली आहेत. यातच व्हॉटसअॅप स्टेटसचं फीचर लोकप्रिय आहे. युजर्स स्टेटसला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. अनेकदा हे फोटो, व्हिडिओ आवडताच इतरांकडून ते पाठवण्याची विनंती केली जाते. अजुनतरी व्हॉटसअॅपने स्टेटस सेव्ह करण्यासाठी कोणतं फीचर आणलेलं नाही. त्यामुळे अनेकदा स्क्रिनशॉट काढले जातात. मात्र व्हिडिओ घेण्यासाठी कोणताच ऑप्शन नाही. आता यासाठी एक पर्याय आहे.

कोणत्याही युजरला स्टेटस डाउनलोड करण्यासाठी आता गुगल प्ले स्टोअरवर एक अॅपसुद्धा आहे. स्टेटस डाउनलोड फॉर व्हॉटसअॅप हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला स्टेटसचे स्क्रीनशॉट काढण्याची गरज पडणार नाही.

अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला क्लिक टू चॅट आणि स्टेटस डाउनलोडर असे दोन पर्याय दिसतील. यापैकी स्टेटस डाउनलोडर पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांनी स्टेटसला ठेवलेले फोटो आणि व्हिडिओ दिसतील. तुम्हाला जो फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा. तो फोटो डाउनलोड होऊन स्टेटस डाउनलोडर फोल्डरमध्ये सेव्ह होईल.

सावधान! तुमच्यावर हालचालींवर आहे नजर, फोटो एडिटिंगसाठी अ‍ॅप्स वापरणं धोकादायक

फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी अॅप पाहिजेच असं काही नाही. तुम्हाला यासाठी एक सेटिंग फोनमध्ये करावं लागेल. स्मार्टफोनमध्ये फाइल मॅनेजरच्या सेटिंगमध्येShow hidden File असा एक पर्याय असतो. तो निवडल्यानंतर फोनमध्ये तात्पुरत्या स्वरुपासाठी डाउनलोड होणाऱ्या फाइल्सचे फोल्डर दिसतात. हे सेटिंग केल्यानंतर तुम्ही WhatsApp/Media या फोल्डरमध्ये .Statuses अशा नावाचा फोल्डर दिसेल. त्यामध्ये सर्व फोटो आणि व्हिडिओ सेव्ह झालेले असतात.

नवीन फोन खरेदी करण्याआधी 8 गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही स्टेटस बघितल्याशिवाय फोटो या फोल्डरमध्ये सेव्ह होत नाहीत. हे फोटो आणि व्हिडिओ जोपर्यंत स्टेटस दिसतो तोपर्यंतच त्या फोल्डरला सेव्ह राहतात. त्यामुळे स्टेटस पाहिल्यानंतर तुम्हाला आवडलेला फोटो किंवा व्हिडिओ इतर फोल्डरला कॉपी करून घ्यावा लागेल.

मोबाइल गरम होत असेल तर काळजी घ्या, होऊ शकतो स्फोट

First published: January 22, 2020, 8:39 PM IST
Tags: whatsapp

ताज्या बातम्या