नवी दिल्ली, 10 मे : कोणताही फोन असला तरी त्यात नेटवर्कसारख्या (Phone Network Problem) समस्या येतात. खराब नेटवर्कमुळे अनेक कामंही बिघडतात. तर कधी खराब नेटवर्कमुळे एखाद्याशी इमरजेंसीमध्ये कनेक्ट होता येत नाही. तसंच कॉल लागल्यास कॉल डिस्कनेक्टसारख्या समस्याही सतत येतात. अशावेळी आपण दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट करण्याचा विचार करतो.
पण या समस्येसाठी नंबर पोर्टची गरज नाही. या समस्येपासून सुटका होण्यासाठी तुमच्या फोनमध्ये एक खास फीचर (Smartphone Feature) दिलेलं आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी फोनमध्ये Wi-Fi असणं गरजेचं आहे. Wi-fi द्वारे तुम्ही नेटवर्क समस्या सहजपणे सोडवू शकता. ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुम्ही सामन्य फोन कॉलप्रमाणे वाय-फाय कॉलिंगचाही (Wifi Calling) फायदा घेऊ शकता. अँड्रॉइड स्मार्टफोन आणि iPhone मध्ये Wi-Fi Calling फीचरची सुविधा मिळते. याद्वारे नेटवर्क समस्या सोडवता (Without Network Calling) येते.
- सर्वात आधी फोनच्या Setting मध्ये जावं लागेल.
- त्यानंतर Mobile Data सेक्शनवर क्लिक करा.
- आता युजर्सला Wi-Fi Calling ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- हा पर्याय तेव्हाच दिसेल, जर तुमचं नेटवर्क Wi-Fi Calling ला सपोर्ट करत असेल.
- ‘Wi-Fi Calling on This iPhone’ इनेबल करावं लागेल. त्यानंतर नेटवर्क समस्या सोडवता येईल.
दरम्यान, देशभरात आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकारने एक देश एक आपत्कालीन क्रमांक 112 लाँच केला आहे. या क्रमांकाचा वापर 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातही 24 तास वापर करता येईल. आपत्कालीन क्रमांक 112 द्वारे तुम्ही फायर ब्रिगेड, मेडिकल आणि पोलिसांची ऑन द स्पॉट मदत घेऊ शकता. देशभरात कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात मोबाइल नेटवर्क येत नसेल तरीही 112 वर कॉल करुन इमेरजेंसी सर्विसद्वारे मदत मिळू शकते. 112 वर कॉल करणं पूर्णपणे मोफत आहे. मोबाइल फोनसह लँडलाइनवरुनही 112 वर कॉल करता येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news