नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : UIDAI द्वारे जारी करण्यात येणारं Aadhaar Card प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारी, खासगी तसंच बँकेच्या कामांसाठी आधार कार्डची गरज असते. कोरोना काळात अनेक कामं डिजीटली करण्यात आली. अशात आधारचा वापर करताना ई-साइन वेरिफाय करणं फायद्याचं ठरतं.
लायसेंस्ड सर्टिफाइंग अथॉरिटी NSDL ई-गव्हर्नेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (NSDL e-Gov) ई-साइनची सुविधा देत असल्याचं म्हटलं आहे. ई-साइन ऑनलाइन इलेक्ट्रिक सिग्नेचर सर्विस आहे. आता आधार कार्ड होल्डर बायोमेट्रिक/ वन टाइम पासवर्ड ऑथेंटिकेशनद्वारे कोणत्याही डॉक्युमेंटवर ऑनलाइन साइन करू शकतात.
e-sign चे फायदे -
e-sign सुरक्षित आहे कारण वापरानंतर यात keys लगेच संपतात. यात वेळेची बचत होते. कागदपत्र, प्रवासात वेळ आणि पैसा दोन्हीही कमी खर्च होतात. आपल्या घरात बसून लोक या सुविधेचा वापर करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे e-sign ला कायदेशीररित्या मान्यता आहे. तसंच ई-साइन इको-फ्रेंडलीही आहे.
अशा पद्धतीने ऑनलाइन करा ई-साइन -
- https://uidai.gov.in/ किंवा https://eaadhaar.uidai.gov.in वर क्लिक करा.
- डाव्या बाजूला असलेल्या 'Validity Unknown' आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर सिग्नेचर वेरिफिकेशन स्टेटस विंडो पॉप-अप होईल.
- इथे सिग्नेचर प्रॉपर्टीज आणि शो सर्टिफिकेट पर्यायावर क्लिक करा.
- NIC 2021 साठी एनआयसी सब-सीए, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रावर क्लिक करा.
- त्यानंतर ट्रस्ट टॅबवर 'Add to Trusted Identity' ऑप्शनवर क्लिक करा.
- इथे Validate signature वर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, M aadhar card