नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : आधार कार्ड (Aadhaar Card) देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सरकारी किंवा खासगी कामांसाठी आधार कार्ड द्यावं लागतं. त्यामुळेच आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवणंही तितकंच गरजेचं आहे, अन्यथा दंड भरावा लागू शकतो. तसंच अनेक कामंही अडकू शकतात.
त्याशिवाय एकाहून अधिक आधार नंबर असल्यासही मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख हे डिटेल्स चुकीचे असल्यास ते लगेच अपडेट करणं आवश्यक आहे. हे अपडेट न केल्यास, मोठं नुकसान होऊ शकतं. घरबसल्या Aadhaar Card मध्ये झालेल्या चुका सुधारता येऊ शकतात, जुनी माहिती अपडेट करता येऊ शकते.
Aadhaar Card ऑनलाईन अपडेट करताना तुमच्या आधारशी लिंक असलेल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल अॅड्रेस, जन्मतारीख, लिंग ऑनलाईन अपडेट करता येतं. इतर बदलांसाठी आधार इनरोलमेंट सेंटरमध्ये जावं लागतं.
- आधारमध्ये अपडेट करण्यासाठी सर्वात आधी सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जावं लागेल. इथे आधार नंबर टाकून रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. त्यानंतर ओटीपी टाकून लॉगइन करुन अपडेट पोर्टलवर जाता येईल.
- त्यानंतर डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. त्यानंतर जे डिटेल्स अपडेट करायचे आहेत, त्यावर क्लिक करा.
- नाव, जन्मतारीख आणि पत्ता बदलण्यासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी असे संबंधित डॉक्युमेंट द्यावे लागतील.
- संपूर्ण माहिती अपडेट झाल्यानंतर सबमिट करावं लागेल. त्यानंतर अपडेट रिक्वेस्ट नंबर स्क्रिनवर येईल, ज्याद्वारे रिक्वेस्ट स्टेटस ट्रॅक करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card