Google Pay वरील व्यवहारांची हिस्ट्री डिलिट करता येते? फॉलो करा या स्टेप्स

Spotify सारख्या सर्व्हिसेसनी ईयरली रिव्ह्यूचा ट्रेंड पॉप्युलर केला. आता अनेक अ‍ॅप्सनी 'ईयर-इन-रिव्ह्यू' चा ट्रेंड सुरू केला आहे. आता या लिस्टमध्ये गुगल पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay- GPay चं नावही सामिल झालं आहे.

गुगल पे अ‍ॅप वापरून केल्या जाणाऱ्या खरेदीच्या माहितीवरून तुम्हाला संबधित वस्तूंच्या जाहिराती येऊ लागतात. हे टाळण्यासाठी तुम्ही गुगल पे (Google Pay Transactions) वरील तुमच्या व्यवहारांची माहिती डिलीट करू शकता.

  • Share this:
नवी दिल्ली, 24 जून: आजकाल ऑनलाइन व्यवहारांचे (Online Transactions) प्रमाण वाढले आहे. यासाठी गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएम (Paytm), भीम अ‍ॅप अशा अनेक अ‍ॅप्सचा वापर केला जातो. या सुविधेमुळे मोबाइलवरून एका चुटकीसरशी पेमेंट करता येतं. रोख रक्कम बाळगण्याची गरज नसते. तसंच तुम्ही असं कोणतंही अ‍ॅप न वापरणाऱ्या एखादया व्यक्तीला पैसे पाठवू शकता तसंच दुसरी व्यक्ती पैसे पाठवूही शकते. गुगल पे अ‍ॅप वापरून केल्या जाणाऱ्या खरेदीच्या माहितीवरून तुम्हाला संबधित वस्तूंच्या जाहिराती येऊ लागतात. हे टाळण्यासाठी तुम्ही गुगल पे (Google Pay Transactions) वरील तुमच्या व्यवहारांची माहिती डिलीट करू शकता. याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. गॅजेटस नाउ डॉट कॉमनं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. इथे वाचा नेमकं काय कराल? - सर्वात आधी गुगल क्रोम (Google Chrome) उघडा. - सर्च बारवर माय अकाउंट गुगल डॉट कॉम (My.account.Google.com) टाईप करा. - त्यांनंतर गुगल अकाउंटवर क्लिक करा. याठिकाणी तुम्ही इन्फो, प्रायव्हसी प्रेफरन्स मॅनेज करू शकता. - तुम्ही नवीन पेजवर जाल, तिथं डेटा अँड पर्सनायझलेशन सिलेक्ट करा. - माय अ‍ॅक्टीव्हीटी सिलेक्ट करा. - आता पेजच्या डाव्या बाजूला सर्वात वर दिसणाऱ्या तीन लाईन्सवर क्लिक करा. हे वाचा-जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन; Jio-Google च्या भागीदारीत होणार लाँच - तिथं गुगल माय अ‍ॅक्टीव्हीटी सिलेक्ट करा. डिलीट अ‍ॅक्टीव्हीटी बाय सिलेक्ट करा. - नवीन पेजवर येईल. तिथं तुम्हाला जे डिलीट करायचे आहे ते सिलेक्ट करा. - ठराविक दिवसाचेच व्यवहार डिलीट करायचे असतील तर डिलीट बाय डेट असा ऑप्शन आहे. सगळेच व्यवहार डिलीट करायचे असतील तर ऑल टाईम हा ऑप्शन सिलेक्ट करा. - त्यानंतर ऑल प्रॉडक्टसमधून गुगल पे ऑप्शन सिलेक्ट करा. - डिलीट ऑप्शन निवडा आणि ओके वर क्लिक करा. - सगळे डिलीट करायचे का? हे विचारणारा पॉप अप येईल तेव्हा डिलीटवर क्लिक करा. त्याचप्रमाणे गुगल पे अ‍ॅप कायमचं डिलीट करू शकता किंवा एखाद्याला त्यावर कायमचं ब्लॉक करू शकता. हे वाचा-गोव्याचा प्लॅन रद्दच करावा लागणार! कोरोनामुळे घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय एखाद्याला कायमचं गुगल पेवरून ब्लॉक करायचे असल्यास... - गुगल पे ओपन करा. - अ‍ॅपवर कॉन्टक्टसमध्ये जा - ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचे आहे तिचा नंबर सिलेक्ट करा. - मोअर ऑप्शन वर क्लिक करा, तिथं ब्लॉक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. गुगल पे कायमचं बंद करण्यासाठी.. - गुगल पे ओपन करा. - तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. - क्लोज अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा. - तुमच्या मोबाइलवरून गुगल पे अॅप अन इन्स्टॉल करा. अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही गुगल पेवरील हिस्ट्री, एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करणं किंवा गुगल पे अ‍ॅप बंद करणं करू शकता.
First published: