Home /News /technology /

केवळ चार स्टेप्समध्ये डिलीट होईल Facebook Search History, पाहा सोपी पद्धत

केवळ चार स्टेप्समध्ये डिलीट होईल Facebook Search History, पाहा सोपी पद्धत

गुगल क्रोमप्रमाणे फेसबुकवरही तुम्ही काय आणि कोणाला सर्च केलं या सर्व गोष्टी दिसतात. जर कोणी तुमचं फेसबुक चेक केलं तर त्याला तुम्ही काय सर्च केलं हे समजू शकतं. पण ही सर्च हिस्ट्री डिलीटही करता येते.

  नवी दिल्ली, 7 मे : सोशल मीडियाची बहुतांश लोकांची सुरुवात फेसबुकने झालेली असते. अनेकांच्या आयुष्यात फेसबुक हे असं पहिलंच App ठरलं जे त्यांना सोशल मीडियावर घेऊन आलं. फेसबुक जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुक सोशल मीडिया Apps पैकी एक आहे. Facebook वर तुम्ही जुन्या मित्रांना शोधून त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. तसंच नवे मित्रही बनवू शकता. या गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत. पण फेसबुकवर काय सर्च केलं, कोणाला पाहिलं अशी फेसबुक सर्च हिस्ट्रीही डिलीट करता येते. गुगल क्रोमप्रमाणे फेसबुकवरही तुम्ही काय आणि कोणाला सर्च केलं या सर्व गोष्टी दिसतात. जर कोणी तुमचं फेसबुक चेक केलं तर त्याला तुम्ही काय सर्च केलं हे समजू शकतं. पण ही सर्च हिस्ट्री डिलीटही करता येते. गुगल क्रोमची हिस्ट्री डिलीट करता तशीच या Facebook App ची हिस्ट्रीही डिलीट करता येते. यासाठी काही सोप्या स्टेप्समध्ये तुमचं काम होऊ शकतं. Facebook App वरुन कशी डिलीट कराल हिस्ट्री - - सर्वात आधी स्मार्टफोनवर Facebook App ओपन करा. - त्यानंतर तुम्हाला सर्च आयकॉनवर क्लिक करावं लागेल. हे रिसेंट सर्चच्या बाजूला असेल. - आता अॅक्टिव्हिटी लॉग ओपन होईल. इथे क्लियर सर्च ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. अशाप्रकारे केवळ चार सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही फेसबुक हिस्ट्री डिलीट करू शकता.

  हे वाचा - Social Media वर अन-सोशल होण्याची गरज? मानसिक, शारीरिक आरोग्यावर असा होतोय परिणाम

  जर तुम्ही वेब ब्राउजरद्वारे फेसबुक वापरत असाल, तर फेसबुकच्या ऑफिशियल साइटवर facebook.com वर जावं लागेल. त्यानंतर युजरला टॉप राइट कॉर्नरवर ड्रॉप डाउन अॅरोवर क्लिक करा. आता Privacy and Security ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Activity Log वर क्लिक करा. आता अॅक्टिव्हिटी लॉगमध्ये Logged actions and Other Activity ऑप्शनवर क्लिक करा. इथे Search History चा पर्याय मिळेल. त्यानंतर क्लियर सर्चवर क्लिक करुन सर्च हिस्ट्री क्लियर करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Facebook, Tech news

  पुढील बातम्या